शुभमंगल सावधान! IPL संपताच KKR चा स्टार ऑलराऊंडर चढला बोहल्यावर

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा नुकतीच संपली. 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सने(married) या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदानंतर आता लगेचच आठवड्यातच अष्टपैलू वेंकटेश अय्यर लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटोही सध्या व्हायरल होत आहेत.

वेंकटेश अय्यरने रविवारी (2 जून) पारंपारिक पद्धतीने श्रृती राघुनाथन हिच्याशी लग्न(married) केले. त्यांच्या लग्न समारंभासाठी कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

तसेच व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसते की वेंकटेश आणि श्रृती या दोघांनीही विवाहावेळी पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीचे पोषाख परिधान केले आहेत.

वेंकटेश आणि श्रृती यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपूडा केला होता. त्यानंतर आता ६ महिन्यांनी ते बोहल्यावर चढले आहेत. वेंकटेश क्रिकेट खेळत असला, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रृतीने फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. तसेच ती सध्या बंगळुरूमध्ये नोकरी करते.

वेंकटेशबद्दल सांगायचे झाले, तर त्याने नुकतेच कोलकाता नाईट रायडर्स संघाबरोबर आयपीएल 2024 स्पर्धेच्या विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. कोलकाताला ही ट्रॉफी जिंकून देण्यात त्याचेही मोलाचे योगदान राहिले.

अंतिम सामन्यात त्याने 26 चेंडूत नाबाद 52 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याने आयपीएल 2024 मध्ये 14 सामन्यांत 158.80 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 370 धावा केल्या, ज्यात त्याच्या 4 अर्धशतकांचा समावेश आहे. वेंकटेश भारताकडूनही 2 वनडे आणि 9 टी20 सामने खेळला आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर हातकणंगले कार्यकर्त्यांची वाढली उत्कंठा ! कोण मारणार बाजी…

रोहितला मैदानात घुसून भेटणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, यानंतर हिटमॅनने जे केलं ते…!

ठाकरे- पवार इज बॅक… आता बंडखोर काय करणार?; विधानसभेपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी?