भारत- पाक सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आलं मोठं कारण

आयसीसी टी -२० विश्वचषक(match) २०२४ स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत – पाकिस्तान सामना ९ जून रोजी खेळला जाणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होईल. तर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.

या सामन्यापूर्वी खेळपट्टीवरून(match) जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. या खेळपट्टीवरून अनेक दिग्गज खेळाडूंनी टीका देखील केली आहे. दरम्यान श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. काय आहे कारण? जाणून घ्या.

आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात श्रीलंकेचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले आहेत. याच मैदानावर भारत आणि पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यात गोलंदाजांसमोर फलंदाजांची पळता भुई थोडी झाली. त्यामुळे केवळ भारतीय संघच नव्हे तर पाकिस्तानच्या फलंदाजांचा टेन्शन वाढलं असेल. भारत-पाकिस्तान सामन्यात गोलंदाजांची चांदी होणार की फलंदाज बाजी मारणार हे पहा ना महत्त्वाचा ठरणार आहे.

भारतीय संघाचा प्लस पॉइंट म्हणजे रोहित शर्मा ने t20 वर्ल्ड कप साठी चार अनुभवी फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिले. आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला तर फिरकी गोलंदाजांचा मोर फलंदाज अडचणीत सापडताना दिसून आले आहेत त्यामुळे फिरकी गोलंदाज सांगत असण्याचा भारतीय संघाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

भारतीय संघाचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंड विरुद्ध होणार आहे. हा सामना देखील नासा व पावती आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातही भारतीय संघाकडे खेळपट्टीचा अंदाज घेण्याची संधी असणार आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरमध्ये कारने चौघांना चेंडूसारखं हवेत उडवलं! 3 ठार Video

6 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची

लोकसभेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत कोल्हापुरात ‘सतेज’ करिश्मा