श्वेता तिवारी ‘त्या’ इंटिमेट सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका(filmy4wap) साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्री अभिनय विश्वात सक्रिय आहे. नुकताच, अभिनेत्री एका वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. ‘हम तुम और देम’ असं सीरिजचं नाव होतं. सीरिजमध्ये श्वेता तिवारी हिने अभिनेता अक्षय तिवारी याच्यासोबत काही इंटिमेट सीन दिले होते. श्वेता तिवारी हिचा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

सीरिजमध्ये इंटिमेट सीन दिल्यामुळे श्वेता तिवारी(filmy4wap) हिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला होता. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘जी लोकं अश्लीलता पाहतात तीच लोकं विरोध करत असतात. अशीच लोकं नेटफ्लिक्सवर जाऊन हॉलिवूड शो पाहातात.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘विरोध करणारेच परदेशात तयार होणारे बोल्ड शो पाहात असतात. दुसऱ्या भाषेत असणाऱ्या शोची चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगलेली असते. शोमधील हा पार्ट नक्की पाहा… तो पार्ट नक्की पाहा… असं बोलत असतात आणि माझं काम त्यांना चुकीचं वाटतं… हेच शो तुम्ही भारतात बनवत असाल तर तुम्ही अश्लील झालात…’

‘दोन्ही बाजूने बोलणारे लोक आपल्या समाजात आहेत. दुटप्पी भूमिका मांडणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता तिवारी हिने इंटिमेट सीनवर केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

श्वेता तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. त्यानंतर श्वेता तिवारी हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘बिग बॉस’त्या ट्रॉफीवर देखील अभिनेत्रीने स्वतःचं नाव कोरलं. श्वेता हिला खासगी आयुष्यात यश मिळालं. पण अभिनेत्रीला वैवाहिक आयुष्याचं सुख फार काळ अनुभवता आलं नाही. अभिनेत्रीने दोन वेळा संसार थाटला. पण अभिनेत्रीचे दोन्ही लग्न फार काळ टिकले नाहीत.

श्वेता तिवारी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्रीची मुलगी पलक तिवारी हिने देखील ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

हेही वाचा :

त्यांचा मला जीवे मारण्याचा प्रयत्न, उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप

धोनीचा जबरा फॅन! माहिसाठी गर्लफ्रेंडशी ब्रेकअप, कारण काय तर… पोस्टर व्हायरल

सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण ‘पायथन’ टीमला दाखवला बाहेरचा रस्ता