राखी सावंतचं हे रुप तुम्ही कधीही पाहिलं नसेल! Video Viral

ड्रामाक्वीन असणारी राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे(viral) चर्चेत येते. राखी सावंत ही वेगवेगळ्या कलाकारांविषयी स्पष्टपणे बोलताना दिसते. राखीचे वेगवेगळे अंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सध्या राखीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात ती एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे.

इतकंच नाही तर त्यात तिला ओळखणं देखील कठीण(viral) होत आहे. त्यावेळी राखी ही बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूर यांच्या सावरिया या चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचली होती. त्याचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. चला तर पाहूया तो व्हिडीओ…

सध्या इन्स्टाग्राम रेट्रो नावाच्या पेजवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत संजय लीला भन्साळी यांच्या सावरिया या चित्रपटाच्या प्रीमियरची पार्टी असल्याचे दिसत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटात रणबीर कपूर आणि सोनम कपूर हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. इतकंच नाही तर ते दोघं या चित्रपटातूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत होते. या शिवाय त्या व्हिडीओमध्ये सलमान खान देखील दिसला आहे.

मात्र, सगळ्यांचं लक्ष हे राखी सावंतनं वेधलं आहे. या कार्यक्रमात राखी सावंत ही सिल्वर रंगाची साडी नेसून आली आहेत. यावेळी देखील नेहमी प्रमाणेच राखी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. त्यावेळी तिनं डीप नेक ब्लाऊज परिधान केला होता तर डायमंड असलेला नेकलेस तिनं घातला होता. यावेळी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसलेली राखी सगळ्यांची मने जिंकताना दिसते. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत राखी चित्रपटाची स्तुती करताना दिसते.

राखीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की ‘जेव्हा तिनं काही ट्रिटमेंट केली नव्हती ती आधी काय सुंदरी दिसायची.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘प्लास्टिक सर्जरी न करता राखी सावंत कशी दिसते.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तिनं स्वत: वर जेवढी मेहनत केली तिला चित्रपटात मुख्य भूमिकेत एकतरी संधी मिळायलाच हवी.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘सर्जरी न करता ती सुंदर दिसते.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आता प्लास्टिक सर्जरीनं तिची सगली सुंदरता गमावली आहे.’

हेही वाचा :

दहा दिवसांमध्येच कोसळले सोन्याचे भाव; चांदीही झाली स्वस्त..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अनिल कपूरच्या ‘या’ भूमिकेची भुरळ

‘मी प्रत्येक सामन्यानंतर..’; धोनीने सांगितलं 17 वर्षांपासून IPL मध्ये मिळणाऱ्या यशाचं Secret