राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरु आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिलाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार(candidate) जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे.

बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदेमध्ये निवडणूक होत आहेत. त्यापैकी गेवराई नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या गटाकडून माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्या पत्नी शितल महेश दाभाडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्याकडून या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूका घेतली जाईल. कोकण विभागात 27, नाशिक विभागात 49, पुण्यामध्ये 60, संभाजीनगरमध्ये 52 आणि अमरावती विभागात 45 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 10 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत(candidate). अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर असून, उमेदवारांच्या अर्जाची छानननी 18 नोव्हेंबरपासून होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर आहे. 13 हजार 355 केंद्रावर निवडणूक पार पडणार आहे. दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाकडून दक्षता घेण्यात आली आहे.

हेही वाचा :

सुत दरात वाढीची शक्यता! कापूस दर तेजीत, वस्त्रउद्योग सावध

‘प्लीज मला शाळेत नाही जायचंय…’ शाळेतच स्वत:ला संपवणाऱ्या त्या….

कातील लूक, कॉम्पॅक्ट मॉडेल, भविष्यातील इलेक्ट्रिक कार, नजरा हजारदा वळणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *