‘१५ सेकंद पोलीस हटवा, कुठे गायब व्हाल समजणार नाही…’ नवनीत राणांचा ओवैसी बंधूंना थेट इशारा

देशभरात लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे(police). लोकसभेच्या प्रचारात राजकीय नेत्यांमध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप, टीका, टिप्पणी अन् आव्हाने दिली जात आहेत. भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंवर निशाणा साधताना १५ सेकंद पोलीस हटवा, कुठे गायब व्हाल कळणार नाही, असे थेट आव्हान दिले आहे. त्यांच्या या भाषणाने भाजप- एमआयएममध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या भाजपच्या स्टार प्रचारक(police) म्हणून आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी हैद्राबाद शहरातील चंपापेठ येथे श्रीमती माधवीलता यांच्या प्रचार साठी युवा मेळावा घेतला. यावेळी नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंवर जोरदार निशाणा साधत थेट आव्हान दिले.

” तुम्ही म्हणता १५ मिनिटे पोलीस हटवा आम्ही काय आहे ते सांगतो. पण युवकांनी ठरवले तर तुम्हाला १५ मिनिटे लागतील मात्र १५ सेकंद पोलीस हटवा, छोटे ओवेसी अन् मोठ्या ओवैसीला समजणार नाही. तुम्ही कुठे होता? कुठे गायब झाले, तुम्हाला कळणार नाही;” असा धमकी वजा इशाराच नवनीत राणा यांनी दिला.

दरम्यान, नवनीत राणा यांच्या या धमकीनंतर वारिस पठाण यांनीही सडेतोड प्रत्यूत्तर दिले आहे. “नवणीत राणा यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. काय करणार आहात? १५ मिनिटात मारुन टाकणार आहात का? मुस्लिम नेत्यांना मारण्याचा कट आहे का? पोलीस प्रशासन काय करत आहे?” असा संतप्त सवाल वारिस पठाण यांनी केला आहे.

हेही वाचा :

दीपिका पादुकोणच्या प्रेग्नंसीबाबत चाहत्यांमध्ये प्रश्न; बेबी बंप कुठे?

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला पुन्हा लिहिलं पत्र; दिलं ‘हे’ वचन

सरकारच्या गोंधळामुळं कांदा बंदरावर सडतोय, निर्यातीला सरकारचा खोडा