महिन्यापूर्वी मुलगा गेला, पतीचा शरीरसंबंधासाठी दबाव, चिडून घर सोडताच रिकाम्या ट्रेनमध्ये सामूहिक अत्याचार, महिलेच्या दाव्याने खळबळ

पानिपतमध्ये उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप 35 वर्षीय विवाहितेने केला आहे.(empty)24 जूनच्या रात्री ही घटना घडल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे पतीने मारहाण केली. त्यानंतर आपण घराबाहेर पडलो असताना हा प्रकार घडल्याचं महिलेने म्हटलं आहे.”माझ्या तीन वर्षांच्या मुलाचा जेमतेम एक महिन्यापूर्वी मृत्यू झालाय. त्यामुळे मी आधीच खूप दुःखी आणि घाबरलेली होते. मला शारीरिक संबंध ठेवायचीही भीती वाटत होती. पण माझा नवरा माझ्यावर दबाव टाकत होता. मी विरोध केला, तेव्हा त्याने मला मारलं आणि धमकी दिली की, ‘जर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाहीस, तर बाहेरचा कोणीतरी तुझ्यावर बलात्कार करेल’. मी घाबरले आणि काही सामान घेऊन रात्री घराबाहेर पडले” असे पीडितेने माध्यमांना सांगितलं.

पीडितेने सांगितलं की, रस्त्यावर एक तरुण तिच्याजवळ आला आणि त्याने तिला मदत करण्याची तयारी दाखवली. त्याने सांगितले की, ती त्याच्या पत्नीसोबत सुरक्षितपणे रात्र काढू शकते. रात्र खूप झाली होती. तो आपल्याला पानिपत रेल्वे स्टेशनवर घेऊन गेला. एका उभ्या असलेल्या ट्रेनच्या निर्जन डब्यात त्याने नेले. (empty)त्याने सांगितले की, त्याचं सामान आतमध्ये आहे. मला थोडी भीती वाटली, पण तो मला धीर देत राहिला, असा दावा तिने केला.ट्रेनच्या डब्याच्या आत गेल्यावर, त्याच तरुणाने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी पळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आणखी तिघं जण बाहेर जाण्याचा रस्ता रोखून उभी असल्याचं मला दिसलं. त्यांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला आहे. “त्यांनी अनैसर्गिक कृत्य करण्याचाही प्रयत्न केला, पण जेव्हा मी गयावया केली, तेव्हा त्यांनी माघार घेतली” असे तिने रडत सांगितले.

हल्लेखोर निघून गेल्यावर मी रेल्वे रुळांवरुन सोनीपतच्या दिशेने निघाले. मला काहीच समजत नव्हतं. त्यामुळे मी रुळांजवळ असलेल्या रासायनिक द्रव्याच्या डबक्यात पडले. त्याच क्षणी शेजारुन गेलेल्या एका ट्रेनमुळे माझा पाय कापला. मी बेशुद्ध झाले, असं तिने सांगितलं. महिलेला पीजीआयएमएस रोहतक येथे दाखल करण्यात आलं. तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत.पानिपत रेल्वे पोलिसांनी अज्ञात तरुणांविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे. स्टेशनवरील CCTV फुटेज तपासले जात आहे आणि संशयितांचा शोध घेण्यासाठी टीम आसपासच्या परिसरात शोध घेत आहेत. आम्ही पीडितेच्या जबाबाला महत्त्वाचा पुरावा मानत आहोत आणि लवकरच आरोपींना अटक करू, असे एका वरिष्ठ GRP अधिकाऱ्याने सांगितले.

पीडितेने तिच्या पतीविरुद्ध दीर्घकाळ घरगुती हिंसा आणि वैवाहिक बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे.(empty)”माझ्या नवऱ्याच्या धमक्यांमुळे मी घर सोडले” असे तिने हॉस्पिटलच्या बेडवरून सांगितले. “जर मी घर सोडले नसते, तर कदाचित हे घडले नसते, पण मला घरातही सुरक्षित वाटत नव्हते,” असे ती म्हणाली.सोनीपत GRP अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेबद्दल अजून स्पष्टता नाही. “ती खूप मानसिक तणावात आहे आणि वारंवार तिच्या बोलण्यात विसंगती आढळत आहे. हल्ल्याचं नेमकं ठिकाण ती व्यवस्थित सांगू शकत नाही,” असे GRP प्रभारी अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळाची पाहणी अजून बाकी आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :