KKRच्या ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माची सीक्रेट मीटिंग? अफवांच्या बाजारात चर्चांना उधान

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने(room) आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. आयपीएल 2024 च्या 60 व्या सामन्यात कोलकाताने मुंबई इंडियन्सचा पराभव करून प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. प्लेऑफसाठी पात्र ठरणारा कोलकाता पहिला संघ ठरला आहे.

दुसरीकडे, मुंबई इंडियन्स(room) आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली होती. अशा स्थितीत मुंबईच्या पराभवामुळे त्यांना गुणतालिकेत फारसा फरक पडलेला नाही. पण रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

खरं तर पावसामुळे हा सामना उशिरा सुरू झाला होता. आणि नाणेफेकीपूर्वी मुंबई इंडियन्सचा स्फोटक सलामीवीर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या खेळाडूसोबत बोलताना दिसला. जेथे कोलकाता नाईट रायडर्सचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, केएस भरत आणि मनीष पांडे रोहित शर्माशी काय तरी बोलत आहे.

त्यामुळे या अफवांच्या बाजारात याविषयी तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. रोहित शर्माने केकेआरच्या खेळाडूंसोबत सीक्रेट मीटिंग घेतली, कारण त्याला पुढील हंगामात मुंबई इंडियन्स संघ सोडून कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील होण्यासाठी अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

मात्र, याचा कोणताही पुरावा नसून सोशल मीडियावरील चाहत्यांकडून हा केवळ अंदाज आहे. यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सने एक व्हायरल व्हिडिओ डिलीट केला होता, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर बोलत होते.

हेही वाचा :

रागीट पार्टनरला ‘या’ टिप्सने हँडल करा; दुसऱ्या दिवशी स्वत: सॉरी म्हणेल

तुफान उसळीनंतर सोने-चांदीची विश्रांती; इतका उतरला भाव

उद्धव ठाकरेंना 1999 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा