वंचित बहुजन आघाडीत मोठी फूट; नाराज जिल्हाध्यक्षांनी दिला काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा

अमरावती : अमरावतीचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी बंडखोरी(candidate) केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गवई यांच्या भूमिकेमुळे अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडली आहे.

लोकसभा निवडणुकीत(candidate)वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले. वंचित बहुजन आघाडीने अमरावतीमध्येही उमेदवाराची घोषणा केली होती. वंचितने प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यानंतर जागेवर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढविण्याचा इच्छा दर्शवली.

त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई नाराज झाले. त्यांनी पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला. शैलेश गवई यांच्या भूमिकेमुळे अमरावतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.

‘अमरावतीत समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा वाढता दबाव असल्याने पक्षाविरोधात निर्णय घेतला असल्याची माहिती, शैलेश गवई यांनी दिली. जिल्हाध्यक्ष गवई यांच्या भूमिकेमुळे वंचित बहुजन आघाडीकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

वंचितने आनंदराज आंबेडकर यांना पाठींबा दिल्याने जिल्हाध्यक्ष नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपब्लिकन सेना वंचितच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देत नसल्याचा आरोप, गवई यांनी केला. वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी बळवंत वानखडे यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा :

छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली तरी जागेचा सस्पेन्स कायम

कलह मिटविण्यासाठी शरद पवार मैदानात; घडामोडींना आला वेग

फडणवीसांना मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधानपदाचं स्वप्न पडलं; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा