ऑस्ट्रेलियातून एक वाईट बातमी समोर येतेय. ऑस्ट्रेलियाच्या एका युवा क्रिकेटरच्या (cricketer)डोक्याला बॉल लागल्याने त्याचा अचानक मृत्यू झाला. मंगळवारी मेलबर्नमध्ये टी २० सामन्यासाठी वार्मअप करत असताना त्याच्या डोक्याला बॉल लागला. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं. ही घटना फर्नट्री गली के वॉली वर रिजर्वमध्ये झाली. युवा क्रिकेटरसोबत घडलेल्या घटनेने उपस्थित सर्वांना धक्का बसला. युवा क्रिकेटरच्या मृत्यूमुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरली.

17 वर्षांचा बेन ऑस्टिन मंगळवारी फर्नट्री गलीमध्ये नेट प्रॅक्टिस कर होता. तेव्हा एका स्वयंचलित बॉलिंग मशीनमधून निघालेला एक बॉल युवा क्रिकेटरच्या (cricketer)डोक आणि मानेच्या मधील भागाला जाउन लागला. असं म्हटलं जातंय की बेन ऑस्टिनने हेल्मेट सुद्धा घातलं होतं. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजण्यापूर्वी युवा क्रिकेटरला गंभीर स्थितीत रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्याला लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं मात्र अखेर बुधवारी त्यांचं निधन झालं.

फर्नट्री गली क्रिकेट क्लबने म्हटले आहे की, ‘आमच्या खेळाडूच्या दुःखद निधनाने आम्हाला खूप धक्का बसला आहे आणि या तरुणाच्या निधनाने क्रिकेट समुदायातील प्रत्येकजण खूप दुःखी आहे’.2014 मध्ये शेफील्ड शील्डमध्ये फलंदाजी करताना मानेला दुखापत झाल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्युजेसचा सुद्धा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या बरोबर एका दशकानंतर पुन्हा एकदा ही घटना घडली. बेन ऑस्टिनच्या मृत्यूसाठी कोणालाही दोषी ठरवण्यात आले नाही.
हेही वाचा :
अभिनेत्रीने बनियान घालून… आजही विसरता येणार नाहीत ते सीन..
आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो..
25,000 पेक्षा कमी किमतीत Redmi Note फोन, Amazon वरील ऑफर जाणून घ्या