कलह मिटविण्यासाठी शरद पवार मैदानात; घडामोडींना आला वेग
महाविकास आघाडीत रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या(faster) शरद पवार गटाला सूटला. या ठिकाणी भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. पण त्यावरुन पक्षात कमालीची धुसफूस पाहायला मिळत आहे. या नाराजीनाट्यावर पडदा टाकण्यासाठी काल, गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तळ ठोकून होते.
पण कार्यकर्त्यांनी त्यांची जाहीर नाराजी(faster) व्यक्त केली. त्यामुळे आज 21 एप्रिल रोजी दस्तूरखुद्द शरद पवार हेच जळगावमध्ये सकाळीच दाखल झाले. शरद पवार यांचे जळगाव विमानतळावर रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. आता पदाधिकाऱ्यांसोबत बंद द्वार बैठक सुरू असल्याचे कळते.
माजी खासदार ईश्वरलाल जैन हे सुद्धा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासोबत सुरू असलेल्या बैठकीत रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील हे पण उपस्थित आहे. पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार यांची बंद वार चर्चा सुरू आहे. नेमकी काय चर्चा सुरू हे बाहेर येऊ शकलेलं नाही. मात्र कार्यकर्त्यांची नाराजी रावेर लोकसभेत निवडणुकी संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडींबाबत शरद पवार यांची पदाधिकाऱ्यांचे चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
रावेरमध्ये भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व कार्यकर्त्यांची नाराजी समोर आली. ते या मतदार संघातून खासदारकीसाठी इच्छुक होते. त्यांनी तशी इच्छा पण व्यक्त केली होती. पण भाजपमधून आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने ते नाराज झाले. त्यांच्या समर्थकांनी सुद्धा हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला.
जयंत पाटील यांनी काल शिष्टाईचा प्रयत्न केला होता. संतोष चौधरी यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात आता शरद पवार हेच दाखल झाल्याने काय घडामोड घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीराम पाटील यांची उमेदवारी कायम राहते का, संतोष चौधरी यांची नाराजी दूर होणार का? या प्रश्नांची उत्तरे अवघ्या काही वेळातच मिळणार आहे.
हेही वाचा :
बजाज पुढील महिन्यात भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणणार
पोस्टरवर राज ठाकरे, पण प्रेसनोटमधून पक्ष गायब, श्रीकांत शिंदेंना मनसे पाठिंबा देणार?
फडणवीसांना मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधानपदाचं स्वप्न पडलं; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा