क्रिकेट विश्वात खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट

1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचा(cricket world) थरार रंगणार आहे. मात्र, याआधीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. आता टी-20 वर्ल्ड कपवर दहशतवादी हल्ल्याचे संकट निर्माण झाले आहे. ही धमकी पाकिस्तानकडून आली आहे. मात्र, यादरम्यान क्रिकेट वेस्ट इंडिजने पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.

1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होणार असून अंतिम सामना(cricket world) 29 जून रोजी होणार आहे. या स्पर्धेत एकूण 55 सामने होणार असून त्यात 40 गट सामने होतील आणि त्यानंतर सुपर 8 सामने आयोजित केले जातील. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित केली जात आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, उत्तर पाकिस्तानमध्ये असलेल्या आयएस-खोरासानकडून वर्ल्ड कपदरम्यान कॅरेबियन देशांना लक्ष्य करण्याचा धोका आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने टी-20 वर्ल्ड कपसह जगभरातील मोठ्या स्पर्धांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.

कॅरेबियन मीडियानुसार, आयएसच्या मीडिया ग्रुप ‘नशीर पाकिस्तान’च्या माध्यमातून वर्ल्ड कपला संभाव्य धोक्याची गुप्तचर माहिती मिळाली होती.

तर क्रिकेट वेस्ट इंडिजने सुरक्षेचे पूर्ण आश्वासन दिले आहे. बोर्डाचे सीईओ जॉनी ग्रेव्हज यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले, आम्ही यजमान देश आणि शहरांच्या सतत संपर्कात आहोत आणि प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही कसून नियोजन करत आहोत जेणेकरून कोणत्याही संभाव्य धोक्याचा सामना करता येईल.

हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर

काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप