काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून एक मोठी(political campaign strategies) बातमी समोर आली आहे. गौरीगंज परिसरात काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

भाजपच्या कार्यकर्त्यांनीच या वाहनांची तोडफोड(political campaign strategies) केली, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. जेव्हा भाजप कार्यकर्ते वाहनांची तोडफोड करीत होते, तेव्हा पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेऊन उभे होते, असा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेश काँग्रेसने आपल्या एक्स हँडलवर लिहिले आहे की, “पराभवाच्या भीतीने भाजपातील नेते घाबरले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमेठीत काँग्रेस जिल्हा कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या डझनभर वाहनांची तोडफोड केली”.

“पोलिसांसमोरच ही तोडफोड झाली असून त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या घटनेवेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी काँग्रेसवाल्यांना सोबत घेऊन तेथून हल्लेखोरांचा पाठलाग केला, मात्र भाजप कार्यकर्ते पळून गेले”, असा आरोप काँग्रेसने केला.

“भाजपने आपला पराभव आधीच मान्य केला आहे, म्हणूनच त्यांचे कार्यकर्ते असे नीच कृत्यांचा अवलंब करीत आहेत. मात्र, राहुल गांधी बब्बर शेर असून ते कोणालाच घाबरत नाही”, असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

सध्या अमेठी लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात असून स्मृती इराणी या विद्यमान खासदार आहेत. यंदा काँग्रेसने त्यांच्याविरोधात किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी या जागेवरून राहुल गांधी यांचा पराभव केला होता.

हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर

गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण… ; उद्धव ठाकरे भाजपवर कडाडले