मशालीने हुकूमशाही भस्म करायची; मशाल गीत लाँच केल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीची(politics) धामधूम सुरु झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. राजकीय पक्षांकडून या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत. अनेक पक्षांचा सोशल मीडियावर प्रचाराचा मोठा भर दिसत आहे. या लोकसभेच्या धामधुमीदरम्यान, ठाकरे गटाकडून मशाल गीत लाँच करण्यात आलं आहे. मशाल गीत लाँच करताना मशालीने हुकूमशाही भस्म करायची, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

आज मंगळवारी ठाकरे गटाकडून मशाल गीत(politics) लाँच करण्यात आलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. ‘मशाल हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलं आहे. मशाल चिन्हाचा विजयाची सुरुवात अंधेरी पोटनिवडणुकीने सुरुवात झाली आहे. आम्ही आता सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहोत. मशाल हे चिन्ह महाराष्ट्रात पोहोचलं आहे. हुकूमशाहीला ही मशाल भस्म करणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे गटाच्या जाहीरनाम्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी पेपर फोडणार नाही. एकेक टप्प्याने आम्ही जाणार आहोत. जाहिरातींचा कार्यक्रम आखतोय. संयुक्त सभा…जाहीरनामा आम्ही लवकरच प्रसिद्ध करू. काँग्रेसने देशातील जनतेसाठी जाहीरनामा केला आहे. त्यात महाराष्ट्रासाठी काही महत्वाचे मुद्दे असतील तर ते आम्ही त्यात सामील करू’.

हेही वाचा :

एकटा पडलाय रोहित शर्मा? ‘हिटमॅन’चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!

निवडणूक आयोग मालामाल! मतदानाआधीच पावणेपाच हजार कोटी ताब्यात

सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोर