साताऱ्याची बहुप्रतीक्षित उमेदवारी अखेर जाहीर, उदयनराजे भोसलेंना भाजपचं तिकीट

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील बहुप्रतीक्षित उमेदवारी(political news today) अखेर जाहीर करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून भाजपतर्फे तिकीट घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे साताऱ्यात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीकडून भाजपचे उदयनराजे भोसले अशी रंगतदार लढत होणार आहे.

भाजपने आपली पुढची उमेदवार यादी जाहीर केली, त्यात उदयनराजेंचं(political news today) नाव आहे. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना उदयनराजेंना तिकीट जारी करण्यात आलं आहे. भाजपने राज्यसभेवरील आणखी एका शिलेदाराला लोकसभेच्या रिंगणात उतरवल्याचं पाहायला मिळत आहे.

उदयनराजे भोसले यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साताऱ्यातून राजकारणाला सुरुवात केली. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीला ते उमेदवार म्हणून उभे राहिले होते. सातारा नगरपालिकेचे नगरसवेक ते खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. १९९६ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतरच्या सातारा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ते विजयी झाले होते. महाराष्ट्रातील शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारच्या काळात ते महसूल राज्यमंत्री देखील होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नानं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

उदयनराजे भोसले यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये काही दिवस काम केल्यानंतर त्यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमाता गौरव दिंडीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करुन मतदारसंघात झंझावात निर्माण केला होता. मतदारसंघ फेररचनेनंतरची पहिलीच निवडणूक असल्यानं शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उदयनराजे भोसले यांना प्रवेश देत उमेदवारी दिली होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांचा पराभव केला.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१४ ची निवडणूक उदयनराजे भोसले यांच्यासाठी सोपी ठरली. महायुतीच्या जागावाटपात ही जागा रिंपाई आठवले गटाकडे आली होती. त्यानंतरच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा विरोध डावलून देखील शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली होती. उदयनराजे भोसले यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही विजय मिळवला होता.

हेही वाचा :

12 महिन्यांनंतर शुक्र स्वगृही, ‘या’ राशींचं नशीब चमकणार

सुहाना खानच्या ‘किंग’साठी शाहरूख खानने गुंतवले २०० कोटी

लालपरीचा प्रवास महागणार! ‘इतक्या’ रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर