उद्धव ठाकरेंना 1999 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

मुंबई : उद्धव ठाकरेंना 1999 मध्येच मुख्यमंत्री(political consultant) व्हायचं होतं असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. 1999 मध्ये ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तर भाजपला सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असे आम्हाला कधीच वाटलं नसल्याचंही फडवीसांनी या मुलाखतीत सांगितलंय. एका मराठी वृत्तपत्राला त्यांनी ही मुलाखत दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे(political consultant) आम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. आम्ही वैचारीक निष्ठेला अधिक महत्त्व देतो. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा कसा वागू शकतो यावर आमचा विश्वास होता. परंतु ती आमची सर्वात मोठी चूक होती. बाळासाहेब ठाकरेंविषयीच्या आदरापोटी आम्ही काही गोष्टी समजून देखील काही बोललो नाही. परंतु सत्य आहे की, उद्धव ठाकरेंना युतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती. 1999 मध्येच त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.

शरद पवारांची साथ सोडून महायुतीत आल्यानंतर अजित पवारांना सातत्याने लक्ष्य केले जाते. पण स्वत: शरद पवारांनी पाच चिन्हांवर निवडणुका लढविल्या आहेत. पाचवेळा चिन्ह बदलले एका भूमिकेत यश मिळत नाही हे लक्षात येताच आणखी नवी भूमिका, नवा प्रयत्न केला आहे. दरवेळी नवे काही करायचा प्रकार केला आहे. एका भूमिकेत यश मिळत नाही हे लक्षात येताच आणखी नवी भूमिका. बारामतीच्या मतदानानंतर निकाल अपेक्षेप्रमाणे लागणार नाहीत हे त्यांच्या लक्षात येताच काँग्रेसमध्ये छोट्या पक्षांचे विलीनीकरण ही नवी चर्चा सुरु केली. त्यांनी कायमच हे केले आहे.

राज्यात युतीचे सरकार आणूनही मी मुख्यमंत्री झालो नाही, याचा मला धक्का बसला होता. नंतर लगेच मी विरोधी पक्षनेता या नात्याने काम करू लागलो. संकटे, आव्हाने येत असतात. पुढे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबतचा निर्णय घेण्यात माझा महत्त्वाचा सहभाग होता. पक्षकार्यकर्ता म्हणून मी ते केले, असे देखील फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

आमदार मित्राच्या घरी गेलेल्या अल्लू अर्जुनवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

आज जुळून आलाय धृती योग! ‘या’ 5 राशींना करिअरच्या नवीन संधी मिळणार

रागीट पार्टनरला ‘या’ टिप्सने हँडल करा; दुसऱ्या दिवशी स्वत: सॉरी म्हणेल