प्लेऑफमध्ये आव्हान संपल्यानंतर विराट इमोशनल; म्हणाला,
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आयपीएल 2024 मधील आव्हान एलिमेटनर सामन्यात संपुष्टात आले. राजस्थानविरोधात आरसीबीला चार विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. (cricket)पुन्हा एकदा आयपीएल चषक जिंकण्याचं आरसीबीचं स्वप्न भंगलं. आयपीएल 2024 मधील एलिमेनटर सामन्यातील पराभवानंतर विराट कोहली भावूक झाला होता. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांची जिद्द अन् आरसीबीचं कमबॅक याची चर्चा झालीच. पण पुन्हा एकदा आरसीबीचं चषक विजयाचं स्वप्न भंगलं.
पराभवानंतर काय म्हणाला कोहली –
एलिमिनेटर सामन्यात पराभव झाल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, ” जेव्हा लागोपाठ पराभव होत होता, त्यावेळा खेळाडू निराश झाले होते. पण मग आम्ही व्यक्त होऊ लागलो.सन्मानासाठी खेळायला सुरुवात केली, आमचा आत्मविश्वास परतला.” विराट कोहली पुढे म्हणाला की, आम्ही ज्या पद्धतीने कमबॅक केले.. सर्व खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. प्लेऑफसाठी क्वालिफाय केले, हे खास होतं. ही गोष्ट नेहमीच आठवणीत ठेवेण. कारण,टीममधील प्रत्येक सदस्याने यासाठी प्रचंड उत्साह दाखवला, मेहनत घेतली. आम्हाला याचा अभिमान वाटतो आणि शेवटी आम्ही जसं खेळायचं ते खेळलो.
फाफ डू प्लेसिस काय म्हणाला ?
एलिमिनेटर सामन्यात पराभव झाल्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेलिसही निराश झाला होता. तो म्हणाला की, शेवटचे सहा सामने खरोखरच अतिशय खास होते. जेव्हा तुम्ही काही खास करता तेव्हा तुमच्याकडून अपेक्षाही वाढतात. यंदाच्या हंगामाचा पहिला हाफ निराशाजनक होता. पण एकदा लय मिळाली की आम्ही जिंकत राहिलो. आम्ही ट्रॉफी जिंकू शकलो नाही हे दु:खद आहे. पण हो, या प्रवासात मला माझ्या टीमचा अभिमान आहे
आरसीबीची कामगिरी –
आयपीएल 2024 मध्ये आरसीबीचं आव्हान प्लेऑफमध्ये संपुष्टात आले. अहमदाबादमध्ये राजस्थानने आरसीबीचा चार विकेटने पराभव केला. आरसीबीने यंदाच्या हंगामात शानदार कमबॅक केले. आरसीबीला पहिल्या टप्प्यात सात पराभवाचा सामना कारावा लागला होता. पण दुसऱ्या टप्प्यात आरसीबीने शानदार कमबॅक केले. त्यांनी सलग सहा सामन्यात बाजी मारत प्लेऑफमध्ये स्थान पटकावले. त्यामुळेच प्लेऑपमध्ये स्थान पटकावता आले.
हेही वाचा :
शेतातून घरी येताच शेतकऱ्याने सोडले प्राण
पुणे अपघात प्रकरणात रोखठोक प्रतिक्रिया देऊन अजित पवार यांनी मौनव्रत सोडले
डोंबिवलीतील स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू, कंपनीच्या मालकांना अटक