विशाल पाटील, विश्वजीत कदम मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार

सांगलीच्या जागेवरुन विशाल पाटील, विश्वजित कदम आणि ठाकरेंमध्ये(gmeet) काही मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार आहेतलोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच निवडणूक निकालानंतर उद्या महाराष्ट्र काँग्रेसची बैठक पार पडणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, या बैठकीसाठी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच सांगलीचे विशाल पाटील ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहे. सांगलीच्या जागेवरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील चढाओढ ते विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवून मिळवलेला विजय, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं(gmeet)महायुतीचा धुव्वा उडवला. लोकसभेच्या रणांगणात सर्वात जास्त चर्चा रंगलेली ती, सांगलीच्या जागेची. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत काही प्रमाणात वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, त्यातूनही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर विशाल पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच पाठींबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार आज पहाटेच विशाल पाटील मुंबईकडे निघाले आहेत. पुण्यातून विश्वजित कदमही त्यांच्यासोबत मुंबईला येणार आहेत. अजुनही विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार आहेत. 

जागावटपाबाबात चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाकडून सांगलीची जागा चंद्रहार पाटलांना जाहीर करण्यात आली. पण, या जागेवर काँग्रेसनं दावा केला होता. काँग्रेसकडून विशाल पाटील सांगलीतून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण तू तू मैं मैं करता-करता अखेर सांगलीची जागा(gmeet) ठाकरेंच्याच पदरात पडली. त्यानंतर काँग्रेसमध्ये काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळालेला. अशातच विश्वनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजित कदम आणि विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. सांगलीच्या उमेदवारीवरुन ठाकरे आणि विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. याच पार्श्वभूमीवर मनभेद, मतभेद दूर करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

महाविकास आघाडीतील विजयी उमेदवार ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर 

महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार आज उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल होत आहेत. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यासोबतच हिंगोलीचे विजयी उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ वाशिमचे विजयी उमेदवार संजय देशमुख, काँग्रेसचे आमदार असलम शेख, मुंबई उत्तर मध्यच्या विजयी उमेदवार वर्षा गायकवाडही मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार आहेत. 

हेही वाचा :

पाणीटंचाईचा मोठा फटका! भाजीपाल्याचे दर कडाडले, नागरिक हैराण

टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात कॅप्टन Rohit Sharma जखमी

मोठी बातमी! चिमुकल्यांची किलबिल कानी पडणार, १५ जूनला शाळेची घंटा वाजणार