सांगली: चंद्रहार पाटलांचे डिपाॅझिट जप्त

 सांगली लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील (deposit) यांना चितपट करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. विशाल पाटील यांनी आपला पाठींबा काँग्रेसला दिला आहे. विशाल पाटील आज शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.सांगलीबाबत आमची चूक झाली. विशाल पाटील  अपक्ष असले तरी आमच्यातीलच आहेत. ते आम्हालाच महाविकास आघाडीला पाठिंबा देतील, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले होते. विशाल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गै यांना पाठींब्याचे पत्र देत ते महाविकास आघाडी सोबतच असल्याचे सांगितले.

सांगलीच्या जागेवरून शिवसेना काँग्रेसमध्ये तणाव (deposit)निर्माण झाला होता. विशाल पाटील यांनी बंडखोरी करत काँग्रेसचा हात सोडत निवडणूक लढली आणि ती जिंकली देखील. मात्र, ठाकरे गटाच्या विरोधात ही निवडणूक जिंकल्याने ठाकरे गटात नाराजी होती. हीच नाराजी विशाल पाटील उद्धव ठाकरेंना भेटून दूर करणार असल्याच्या चर्चा आहेत.

चंद्रहार पाटील यांचे डिपाॅझिट जप्त

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार (deposit)पाटील यांना केवळ 60 हजार 861 मतं मिळाली. त्याचे डिपाॅझिट जप्त झाले. खरी लढत भाजपचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात झाली. या लढतीत विशाल पाटील यांनी एक लाख मतांच्या फरकाने विजयी झाले.

हेही वाचा :

आजी-माजी आमदारांमुळेच हातकणंगलेत सत्यजित पाटलांचा झाला ‘गेम’

 राजू शेट्टींचं काय चुकलं? सदाभाऊ खोतांच उत्तर

विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा