विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी कॉंग्रेसचे (congress)सहयोगी सदस्यत्व बुधवारी स्वीकारले. यासाठीचे पत्र त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले.
माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासोबत खासदार पाटील आजच मुंबईला रवाना झाले होते. मुंबईत प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची भेट ते घेणार होते. मात्र मुंबईत अधिक वेळ न दवडता आमदार कदम यांनी खासदार पाटील यांना घेऊन थेट दिल्ली गाठली. दिल्लीत खरगे यांची भेट घेऊन कॉंग्रेसला पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले.
हेही वाचा :
पावसाचा धुमाकूळ विदर्भ, कोकणसह मराठवाड्यात दमदार पावसाच्या सरी
राजू शेट्टींचं काय चुकलं? सदाभाऊ खोतांच उत्तर
टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात कॅप्टन Rohit Sharma जखमी