राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश मोरे , सरपंच संतोष खडतर , उपसरपंच, सदस्य आणि अनेक शाखाप्रमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला(Committee). या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.या कार्यक्रमात सुनिल तटकरे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत पक्षाच्या ध्येयधोरणांबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी म्हटलं की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Committee)ही लोकाभिमुख विचारांची चळवळ आहे. प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवावा.” त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या वेळी आ. अनिकेत तटकरे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक भाई अंतुले, सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त भास्कर विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, पक्ष प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहल जगताप यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :
YouTube वर ‘घोस्ट नेटवर्क’चा सापळा! लिंकवर क्लिक करताच धोका
मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी…
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, “ठराविक वयात…”