रोहित शर्मानंतर कसोटीत भारताचं नेतृत्व कोणाकडे? ‘या’ दिवशी होणार घोषणा

पुढील महिन्यात भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि विराट कोहलीने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर या दौऱ्यासाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार आणि भारतीय संघाचा कर्णधार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, 24 मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की भारतीय संघाला 24 मे रोजी कसोटीमध्ये नवीन कर्णधार मिळणार आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, कसोटी कर्णधाराच्या शर्यतीत शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांची नावे आघाडीवर आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा शनिवार 24 मे रोजी होणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या(Rohit Sharma) जागी भारतीय संघात अभिमन्यू ईश्वरन किंवा साई सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरीकडे विराट कोहलीच्या जागी संघात सरफराज खानला किंवा केएल राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. नुकतंच इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली असून या संघात सरफराज, अभिमन्यू आणि सुदर्शन याला स्थान देण्यात आले आहे. तसेच या संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरनकडे सोपविण्यात आले आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण असणार याकडे संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिल भारताचा नवीन कर्णधार होणार आहे. भविष्याचा विचार करुन शुभमन गिलकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जसप्रीत बुमराह , केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या नावाचा देखील बीसीसीआयकडून विचार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; कॅब-टॅक्सीसाठी नवे नियम लागू

असं काय केलं महापाप की गर्लफ्रेंडने धावत्या बाईकवरच तरुणाला चप्पलीने दिला चोप ; Video Viral

सिंधू नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवल