फडणवीस, पवारांना भेटलेले जानकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार की स्वतंत्र अस्तित्व ठेवणार?

माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते(latest political news) उत्तम जानकर हे आज सायंकाळी आपला निर्णय जाहीर करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे जानकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार की स्वतंत्र अस्तित्व ठेवून काम करणार, हे आज रात्री जाहीर करणार आहेत.

उत्तम जानकर हे मूळचे भारतीय जनता पक्षाचे(latest political news) महत्त्वाचे नेते. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना माळशिरसमधून विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हेाता. राष्ट्रवादीच्या चिन्हावर जानकर यांनी भाजपचे राम सातपुते यांना जोरदार टक्कर दिली होती. त्यात जानकर यांचा अवघ्या २५९० मतांनी पराभव झाला होता.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. पण, भाजपकडून ऐनवेळी पुन्हा राम सातपुते यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडून दुसऱ्यांदा डावलण्यात आल्यामुळे जानकर कमालीचे दुखावले होते. मात्र, मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जानकर यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले. त्यातूनच माढ्याचे भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जानकर यांना खास विमानातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला नेले होते.

त्या भेटीनंतर जानकर हे आपल्यासोबत येतील, अशी अपेक्षा भाजप नेत्यांना होती. मात्र, फडणवीस यांच्या भेटीनंंतर जानकर हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले. त्यांच्यासोबत माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटीलही होते. त्यामुळे जानकर हे पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसभेला मोहिते पाटील यांना समर्थन द्यायचे, तर विधानसभेला मोहिते पाटील यांनी जानकर यांना मदत करायची, या अटीवर माळशिरस तालुक्यातील या दोन कट्टर गटात समझोता झाल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबत विधानसभा निवडणुकीतच्या वेळीच काय ते समजणार आहे. तसे, झाले तर माळसिरसमध्ये भाजपला मोठा धक्का बसू शकतो.

मुळात मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपची वजाबाकी झाली आहे. दुसरीकडे, महायुतीच्या माध्यमातून भाजपसोबत काही नवीन मित्रही जोडले गेले आहेत. मात्र, मोहिते पाटील यांनी मागील निवडणुकीत एकट्या माळशिरसमधून एक लाखापेक्षा जास्त मतांचे अधिक्य दिले होते, त्यामुळे मोहिते पाटील यांच्यानंतर जानकर यांनीही साथ सोडणे, भाजपसाठी धक्कादायक आहे.

दरम्यान, आजच्या कार्यक्रमाला जयंत पाटील हे माळशिरसमध्ये येणार असून, त्यांच्या उपस्थितीत जानकर हे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय त्यांच्यासोबत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील बडे नेतेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :

शरद पवारांनी डाव टाकला अन्…महायुतीचं टेन्शन आणखीच वाढलं!

शरद पवारांनी रात्रीत सूत्रे फिरवली! अनिकेत देशमुखांचे बंड थंड; उत्तम जानकरही आज ‘तुतारी’ हाती घेणार

भर मैदानात फिल्डींगवरून भिडले हार्दिक-रोहित? Video Viral