बारावीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी; असा पाहा निकाल

गेल्या काही दिवसांपासून सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबतच्या तारखांबाबत सातत्याने सोशल मीडियात बनावट परिपत्रके फिरत हाेती.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई आज त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर इयत्ता (competition)12वी परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदाचा निकाल 87.98 इतका असून हा गत वर्षीपेक्षा 0.65 टक्क्यांनी जास्त लागला आहे. गतवर्षीचा निकाल 87.33 टक्के इतका हाेता. सीबीएसईच्या 12वीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल https://cbseresults.nic.in/ या संकेतस्थळावर पाहण्यास सीबीएसईने उपलब्ध केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबतच्या (competition)तारखांबाबत सातत्याने सोशल मीडियात बनावट परिपत्रके फिरत हाेती. त्यावेळी सीबीएसईने निकालाची तारीख तसेच अन्य माहिती अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल असे स्पष्ट केले हाेते. काेणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले हाेते.

आज सीबीएसईने 12वीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 24,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा जास्त, 1.16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.

यंदा 91.52 टक्के मुलींनी तर 85.12 टक्के मुलांनी परिक्षेत यश मिळविले आहे.(competition) मुलींचे मुलांपेक्षा 6.4 टक्के जादा उत्तीर्ण हाेण्याचे प्रमाण आहे.

हेही वाचा :

कोचिंग सेंटरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार

खळबळजनक! मतदानाच्या दिवशीच नेत्याची हत्या

समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली ‘तारक मेहता…’ची सोनू