आयपीएल २०२५ चे क्वालिफायर सामने आजपासून सुरू होणार आहेत. आज क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगरुळू आमनेसामने असणार आहेत. तसेच मुंबई इंडियन्स आयपीएल २०२५ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. ३० मे रोजी एलिमिनेटरमध्ये मुंबईचा सामना गुजरात टायटन्ससोबत खेळवला जाणार आहे. परंतु, २८ मे रोजी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने एक पोस्ट(retirement) करून खळबळ उडवून दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता.

आयपीएल २०२५ आतापर्यंत भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी खूपच चांगले राहिले आहे. त्याने मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये घेऊन जाण्यास मोठी भूमिका वठवली आहे. त्याने लीग स्टेजच्या प्रत्येक सामन्यामध्ये धावा केल्या आहेत आणि संघाला सहाव्या जेतेपदाकडे एक पाऊल पुढे टाकले आहे. दरम्यान, त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत आणि निवृत्तीशी संबंधित कॅप्शन लिहिले आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.
परंतु, सत्य मात्र वेगळे आहे. सूर्यकुमार यादव कुठेच जाणार नाहीये. त्याने त्याच्या वडिलांच्या निवृत्तीवर(retirement) एक पोस्ट केली आहे. सूर्यकुमार यादवचे वडील अशोक कुमार यादव नुकतेच निवृत्त झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते बीएआरसीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून काम पाहत होते.
सूर्यकुमार यादवने या खास प्रसंगी त्याचे वडील आणि कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यावर एक एक भावनिक कॅप्शन देखील लिहिले आहे. सूर्याने लिहिले की, ‘माझा पहिला आणि नेहमीचा हिरो, आदर्श, जीवन पुस्तक आणि मार्गदर्शक. तुमच्यासाठी एक महत्त्वाची इनिंग संपली आहे आता पुढच्या इनिंगसाठी तयार होण्याची वेळ आली आहे, बाबा. जी थोडी अधिक आरामदायी असणार आहे.’
सूर्यकुमार यादव आयपीएल २०२५ च्या ऑरेंज कॅप शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १४ सामन्यांमध्ये ७१.११ च्या सरासरीने आणि १६७.९७ च्या स्ट्राइक रेटने ६४० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ५ अर्धशतके देखील आहेत. मुंबई इंडियन्ससाठी एका हंगामात कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने प्रत्येक सामन्यात २५ किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत, जो एक जागतिक विक्रम ठरला आहे.
आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिला क्वालिफायर १ सामन्याचा थरार आज बघायाल मिळणार आहे. आज २९ मे रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही दोन संघ आमनेसामने असणार आहेत. जो कोणी हा सामना जिंकेल तो थेट आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीमध्ये धडक मारेल. हा महत्त्वाचा सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरात प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा; 40 दिवसात 15 वेळा पैसे उकळले
खेळाडूची सटकली, फलंदाजाच्या अंगावर धावला, दोन-तीन फटके लगावले Video
धक्कादायक ! पत्नीने नांदण्यास नकार दिल्याने पतीने थेट चाकूच भोसकला; पोटावर, कमरेत सपासप वार