डिजिटल अरेस्टला बळी पडू नका, अशा धमकीचे फोन आल्यास संपर्क साधा अशी मोहीम सरकारकडून राबवली जात असताना तसेच जनजागृती केली जात असतानाही डिजिटल अटकेला बळी पडण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता कोल्हापुरात(Kolhapur) निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल साडेतीन कोटींचा गंडा घालण्यात आला आहे.

मनी लॉन्ड्रिंगची भीती घालून निवृत्त प्राध्यापिकेची आयुष्यभरांची पुंजी सायबर चोरट्यांनी तब्बल 40 दिवसात पंधरा वेळा पैसे ट्रान्सफर करून घेत पूर्णपणे संपवून टाकली आहे. त्यामुळे निवृत्त प्राध्यापिकेला मोठा मानसिक धक्का बसला आहे. मीना मुरलीधर डोंगरे (वय 75) असं निवृत्त प्राध्यापिकेचं नाव असून त्यांना डिजिटल अटकेची भीती दाखवून तब्बल 40 दिवसांमध्ये पंधरा वेळा पैसे ट्रान्सफर करून घेत तीन कोटी 57 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.
या प्रकरणी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी डॉक्टर आणि जावयाला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हा संपूर्ण प्रकार 18 एप्रिल ते 27 मे 2025 या दरम्यान घडला आहे(Kolhapur). दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सम्राटनगरमधील मिमिना डोंगरे आणि त्यांचे पती मुरलीधर हे दोघे एका स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करत आहेत. दोघेही सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. मीना यांच्या मोबाईलवर दुपारी 18 एप्रिल रोजी दुपारी फोन आला.

यामध्ये ट्रायचे अधिकारी असल्याचे सांगत तुमचा नंबर दोन तासात बंद होणार असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या विरोधात 2 जानेवारी 2025 रोजी कुलाबा पोलीस ठाण्यात मनी लाँन्ड्रिंगमध्ये गुन्हा दाखल असल्याची सुद्धा भीती घातली. तसेच तुमचा आधार कार्डचा वापर करून एका बँक शाखेमध्ये मनी लाँड्रिंगचे सहा कोटी रुपये जमा झाले असून याबाबत डिजिटल अरेस्ट कारवाई केली जाणार असल्याची धमकी दिली.
या केसमधून सुटका करून घ्यायचं पैसे द्यावे लागतील अन्यथा पोलीस घरी अटक करतील अशी धमकी दिल्यानंतर त्या पैसे देण्यासाठी तयार झाल्या. त्यानंतर तब्बल 40 दिवस हे सायबर गुन्हेगार या दांपत्याच्या संपर्कात होते. त्यांनी विविध राज्यांमध्ये तब्बल 15 वेळा पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले.
हेही वाचा :
चिंता वाढली! कोरोनाचा नवा व्हेरियंट NB.1.8.1 पूर्वीपेक्षा धोकादायक; भारतात रुग्णसंख्या वाढली
विध्वंसापासून जग किती दूर? एकाच वेळी येणार पूर, दुष्काळ, चक्रीवादळं…. चिंताजनक आकडेवारी समोर
महिना संपताना निफ्टीची सेंच्युरी, 400 च्या वर उघडला सेन्सेक्स, IT Stock ची घोडदौड