ढाका: क्रिकेटच्या(cricket) मैदानावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेर-ए-बांगला स्टेडियमवर बांगलादेश इमर्जिंग टीम आणि दक्षिण आफ्रिका इमर्जिंग टीम यांच्यात सुरू असलेल्या चार-दिवसीय सामन्यात बांगलादेशचा फलंदाज रिपन मोंडल आणि दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज त्शेपो एनतुली यांच्यात हाणामारी झाली.

ही घटना सामन्याच्या(cricket) दुसऱ्या दिवशी घडली. बांगलादेशच्या डावात रिपन मोंडलने एनतुलीच्या गोलंदाजीवर षटकार खेचल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. रिपन साथीदार मेहदी हसनकडे जात असताना एनतुलीने त्याला थांबवून त्याच्यावर हल्ला चढवला. एनतुलीने रिपनच्या हेल्मेटवर दोन वेळा चापटी मारली आणि हेल्मेट ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना ढकलण्यास सुरुवात केली. मैदानावरील पंच कमरुझमान यांनी त्वरित धाव घेत हस्तक्षेप केला आणि प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून, “क्रिकेटच्या मैदानावर अशा प्रकारचा हाणामारीचा प्रकार अस्वीकार्य आहे,” असे म्हणत अनेक क्रिकेटप्रेमींनी(cricket) तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
घटनेनंतर तीन चेंडूंच्या आतच एनतुलीने पुन्हा एकदा राग व्यक्त करत रिपनवर फेकलेला चेंडू मारला आणि त्याला रन आऊट करण्यात यश मिळवले. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगतदार ठरला असून बांगलादेश संघाने खालच्या फळीतही चांगला झगडत ४५ आणि ६७ धावांच्या भागीदाऱ्या करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना चांगलाच प्रतिकार दिला.
South Africa emerging player attacked on South Asian super power kanglu bangladesh player .#TerStegenOut pic.twitter.com/NNdvRVo1FK
— Vaibhu (@Vaibhualt_17) May 28, 2025
या घटनेचा अधिकृत अहवाल अद्याप आलेला नाही, मात्र लवकरच आयसीसी किंवा स्थानिक क्रिकेट मंडळाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. या चार-दिवसीय मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. याआधी बांगलादेशने वन डे मालिका २-१ अशी जिंकली होती, तर पहिला चार-दिवसीय सामना अनिर्णित राहिला होता.
हेही वाचा :
विध्वंसापासून जग किती दूर? एकाच वेळी येणार पूर, दुष्काळ, चक्रीवादळं…. चिंताजनक आकडेवारी समोर
महिना संपताना निफ्टीची सेंच्युरी, 400 च्या वर उघडला सेन्सेक्स, IT Stock ची घोडदौड
कोल्हापुरात प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा; 40 दिवसात 15 वेळा पैसे उकळले