कोल्हापूर : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने बळीराजा अडचणीत आला असून, उन्हाळी पिकांना मोड आले आहेत. या पावसामुळे(Rain) शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. निसर्गाची फिरलेली चक्रे आता शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरली आहेत. ‘धो-धो आला अन् सगळेच धुवून गेला’ अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

यंदा मान्सूनपूर्व पावसाने(Rain) मे महिन्याच्या पहिल्या पंधरावाड्यातच सलामी दिल्याने शेतकरी आनंदी झाला होता. मात्र, हा पाऊस सतत चालू झाल्याने त्याचप्रमाणे पावसाने वेळीच उघडीप दिली नसल्याने धो-धो धोडपून काढल्यामुळे शेतकऱ्यांचे मशागतीचे तसेच पीक काढणीचे गणित बिघडले आहे. भुईमूग, ज्वारी, सूर्यफूल, मका, मूग, वाटाणा, चवळी, भात आदी पिके काढणीला आली असतानाच पावसाने सुरुवात केली. हा पाऊस इतका पडला की, जमिनीतून पाणी शोषून घेण्याची क्षमता सुद्धा संपली आहे.
सध्या जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे ठोसर भरलेल्या धान्यातून कोंब फुटले आहेत. खळ्यावर टाकलेल्या मक्याच्या कणसांना कोंब आले आहेत. तर उभ्या शेतात सूर्यफुलाच्या कणसांच्या अति पाणी गेल्याने काळे पडले आहेत. तर भुईमुगाच्या शेंगांना कोंब आल्यामुळे शेंगांचे वेल सदा उकडणे मुश्किल झाले आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, कलिंगड ही फुल पिके नाशवंत झाली आहेत. तर शेवटच्या टप्प्यात आलेला आंबा पिक झाडावरच राहिल्याने याचे सुद्धा नुकसान झाले आहे.
पंचगंगा नदी पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ
आठवडाभर बरसत असलेल्या दमदार मान्सूनपुर्व पावसामुळे(Rain) पंचगंगा नदी पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे नदीकाठावर शेतीला पाणी उपसा करणारे कृषीपंप सुरक्षित ठेवण्यासाठी परिसरातील शेतकर्यांची लगबग दिसून येत आहे. जिल्ह्यातील धरणातून कोणत्याही प्रकारचा विसर्ग सुरु नसतानाही धुवाधार मान्सूनपूर्व पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ
शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाऊस अजूनही धो..धो..कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील नदीचे पाणी कोणत्याही क्षणी पात्राबाहेर पडू शकते. सध्या नदीकाठावरील गवत कुरणात पाणी विस्तारत आहे. परिणामी, गवत बुडण्याआधी ते कापून आणण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु आहे.

बुधवारी दिवसभर तुरळक पाऊस
बुधवारी दिवसभर तुरळक पाऊस होता. मात्र, पुन्हा सायंकाळी सातनतंर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता. हवामान खात्याने पुढील दोन दिवस जोरदार पावसाचे संकेत दिले आहेत. सध्या सुरू असलेल्या संततधार अवकाळी पावसामुळे पंचगंगा नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून, तेरवाड येथील बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरात प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा; 40 दिवसात 15 वेळा पैसे उकळले
खेळाडूची सटकली, फलंदाजाच्या अंगावर धावला, दोन-तीन फटके लगावले Video
धक्कादायक ! पत्नीने नांदण्यास नकार दिल्याने पतीने थेट चाकूच भोसकला; पोटावर, कमरेत सपासप वार