लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला होता. आता महिलांची प्रतिक्षा संपलेली आहे. (receiving )लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी स्वतः ही माहिती दिली आहे. आजपासून महिलांच्या खात्यात मे महिन्याचा सन्मान निधी वितरीत केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
मे महिना उलटून गेला तरीही खात्यात १५०० रुपये जमा न झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मे महिन्याचा हप्ता कधी येणार, जूनच्या हप्त्याचं काय असे प्रश्न विचारले जात होते. दरम्यान, आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचे स्वतः आदिती तटकरेंनी सांगितले आहे.(receiving )लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात. तुम्हाला फक्त तुमच्या बँकेच्या अॅपवर जाऊन अकाउंट बॅलेंस चेक करु शकतात. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवर एन्ट्री करुन घेऊ शकतात. पासबुकवर तुम्हाला कधी किती पैसे तुमच्या खात्यात जमा झाले याबाबत सर्व माहिती मिळेल.
लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे.(receiving ) त्यांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु केली आहे. यातून तब्बल अडीच लाख सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, आता यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं स्पष्ट नमूद करण्यात आले होते. परंतु तरीही त्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, आता अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे. अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :