राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळीचा कहर पाहायला मिळाला होता. त्यानंतर पावसाने(rain ) उघडीप दिली आहे. आता उन्हाचा चटका आणि उकाड्यात देखील वाढ झाली आहे. तर हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सतर्कतेचा इशारा यलो अलर्ट देखील जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
उर्वरित राज्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळतील. तसेच कमाल तापमानामध्ये देखील चढ-उतार होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजासंह वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची(rain ) शक्यता आहे. 10 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
येत्या 48 तासांत देशातील अनेक भागात हवामानाचे भयंकर रूप पाहायला मिळू शकते. भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. आयएमडीनुसार, पुढील 48 तासांत ईशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार वारे वाहण्यासह अधूनमधून पाऊस पडू शकतो. त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होऊ शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. आयएमडीनुसार, पुढील 2 दिवसांत वायव्य भारतात वादळे आणि वादळी वारे सुरू राहण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आज उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर हिमाचल प्रदेशात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने आणि 70 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मान्सूनची उत्तरेकडील सीमा आता मुंबई, ओडिशा मार्गे पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पोहोचली आहे. यामुळे उत्तर भारताकडे आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. गेल्या 24 तासांत मिझोरम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यासारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. लखनौ आणि त्याच्या आसपासच्या भागात अंशतः ढगाळ वातावरण राहील. संध्याकाळी किंवा रात्री ढगाळ वातावरणासह हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :