वीरेंद्र सहवागच्या संसारात वादळ, पत्नी आरतीला देणार घटस्फोट? चर्चांना उधाण..
भारतीय क्रिकेटपटूंसाठी सध्याचा काळ कठीण आहे. मागील वर्षी हार्दिक पांड्याचा काडीमोड झाला होता. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्याही घटस्फोटाच्या(divorce) चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. यात आता आणखी एका माजी क्रिकेटपटूची भर पडली आहे. एका रिपोर्टनुसार भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवाग आणि त्याची पत्नी आरती यांचा तब्बल 21 वर्षांचा सुखी संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. सध्या दोघेही वेगळे राहत आहेत.
वीरेंद्र सहवाग आणि आरती यांचं लग्न 2004 मध्ये झालं होतं. दोघांना दोन मुलं आहेत. आता मात्र दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. दोघांनीही सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. इतकंच काय तर सहवागच्या अलीकडील सोशल मिडिया पोस्ट पाहिल्या तर त्यात आरती कुठेच दिसत नाही. मागील दिवाळीत वीरेंद्र सहवागने फक्त आई आणि मुलांसह फोटो पोस्ट केला होता. या फोटोतही आरती नव्हती. त्यावेळी सहवागचे चाहते बुचकळ्यात पडले होते.
एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की सहवाग आणि आरती मागील काही दिवसांपासून विभक्त राहत आहेत. लवकरच त्यांचा घटस्फोट(divorce) होईल. दोघांना आर्यवीर आणि वेदांत अशी दोन मुलं आहेत. दोघेही क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. आरती आणि वीरेंद्रमध्ये काहीतरी तणाव आहे किंवा वाद आहेत अशा चर्चा कधीच समोर आल्या नव्हत्या. परंतु, काही काळापासून दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
वीरेंद्र सहवागने 1999 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर 2004 मध्ये त्याने आरती अहलावत हीच्याशी विवाह केला होता. दोघांचे लव मॅरेज होते. या लग्नाबाबत त्यांच्या कुटुंबियांची सहमती नव्हती. दोन्ही कुटुंबे दूरचे नातेवाईक होते त्यामुळे लग्नाला सहमती नव्हती. परंतु, नंतर दोन्ही कुटुंबांना लग्नासाठी राजी करण्यात आलं. तत्कालीन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानी वीरेंद्र सहवाग आणि आरती अहलावत यांचा विवाह झाला. त्यावेळी या शाही विवाहाची चांगलीच चर्चा झाली होती.
हेही वाचा :
महिला प्रांताधिकाऱ्यांना वाळू तस्कराकडून शिवीगाळ अन् धक्काबुक्की; तीन जणांवर गुन्हा दाखल
तुमच्या शरीरावरील ‘हे’ तीळ सांगतात, तुमचे लग्न लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज!
संध्याकाळच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट अंजीर चटणी