सध्याच्या परिस्थितीवर शरद पवारांनी केलं मोठं विधान; म्हणाले, ‘राज्यात एकप्रकारे…’
कोल्हापूर : राज्यात येणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीमुळे एकप्रकारे संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून, अशा आपत्ती व्यवस्थापन काळात मदतीसाठी पुढे धावणाऱ्या संस्थांना बळ देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आली आहे, असे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार(political) यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठात व्हाईट आर्मी संघटनेच्या वतीने शरद पवार यांना महायोद्धा हा पुरस्कार देऊन खासदार शाहू महाराज हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्हाईट आर्मी आणि शिवाजी विद्यापीठ, जिल्हा आपत्ती निवारण केंद्राच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सत्काराला उत्तर देताना खासदार शरद पवार(political) यांनी आपल्या मनोगतात आपत्ती व्यवस्थापनाचे अनेक पैलू उलगडले. लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंपात हजारो घरं पडली. अनेक लोक मृत्युमुखी पडले. अशावेळी इतर जिल्ह्यांची मदत घेऊन तिथली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला.
तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव भूकंपग्रस्त ठिकाणी भेट देणार होते. मात्र, पंतप्रधान आल्यास शासकीय यंत्रणा यांच्या दीमतीला द्यावी लागेल, त्यातून मदत कार्यात विस्कळीतपणा येईल, ही बाब नरसिंहराव यांना पटवून दिली. भूकंपग्रस्त ठिकाणी सध्या तरी येऊ नये असं त्यांना स्पष्ट सांगितलं.
त्यानंतर १९९२ ला मुंबईतील दंगल वाढत चालल्याने केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची सूचना पंतप्रधान नरसिंहराव यांनी केली. त्यानुसार, केंद्रातून परत येऊन अवघ्या तीन-चार दिवसांत मुंबईतील कायदा सुव्यवस्था आपण रुळावर आणली.
मुंबईत दहा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले ही सर्व ठिकाणं हिंदू समाजाशी संबंधित होती. अशा कृत्यातून जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न असल्याचा माझ्या निदर्शनास आल्यानंतर महंमद अली रोडवर बॉम्बस्फोट झाल्याचा आपण स्वतः आकाशवाणीवरून जाहीर केले.
अशा पद्धतीने हिंदू समाजाला सुद्धा शांत करून जलद गतीने दुसऱ्या दिवशी मुंबईतील जनजीवन सुरळीत केले. गुजरातमधील भूज येथे झालेल्या भूकंपानंतरची(political) परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्यावर सोपवली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्षपद आपल्याला दिले.
इतर देशातील आपत्ती संबंधातील मदत कार्ये आणि कायद्याचा अभ्यास करून भारतासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार केला; हाच कायदा देशातील प्रत्येक संकटात जनतेच्या मदतीसाठी उपयुक्त ठरतोय. त्याचच आपल्याला समाधान असल्याचे खासदार शरद पवार यांनी नमूद केले.
शासकीय यंत्र आणि स्वयंसेवी संस्था आपत्तीच्या वेळी झोकून देऊन काम करतात. अशा संस्थांना नागरिक म्हणून पाठिंबा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. देशात आणि महाराष्ट्रात ज्या-ज्या वेळी भूकंप, बॉम्बस्फोट, जातीय दंगली घडल्या अशा आपत्ती त्या त्यावेळी अनेकदा आपण तेथे धावून गेलो आहे. यंत्रणा कामाला लावली आहे, ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन शक्य झाले. तसेच राज्यातील सर्वच आपत्ती काळात प्रशासकीय यंत्रणेने चांगले काम केले आहे. अनेक संस्था या अशावेळी कामासाठी पुढाकार घेतात. अशा संघटनाना, संस्थांना बळ देण्याची जबाबदारी आपली आहे.
खासदार शाहू महाराज म्हणाले, खासदार शरद पवार यांनी भूकंप, बॉम्बस्फोट अशा अनेक आपत्तीमध्ये केलेले काम अतिशय चांगले आहे. देशात आणि महाराष्ट्रात अनेक प्रकारचे संकटे आली. अशावेळी योग्य निर्णय घेत त्यांनी त्यावेळी मदत पोहचवत सहकार्य केले. अतिशय योग्य व्यक्तीला हा पुरस्कार दिला आहे.
हेही वाचा :
वीरेंद्र सहवागच्या संसारात वादळ, पत्नी आरतीला देणार घटस्फोट? चर्चांना उधाण..
संध्याकाळच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट अंजीर चटणी
महिला प्रांताधिकाऱ्यांना वाळू तस्कराकडून शिवीगाळ अन् धक्काबुक्की; तीन जणांवर गुन्हा दाखल