पर्सनल लोन घेण्यापूर्वी सावधान! ‘या’ 10 चुका केल्यास मोठे आर्थिक नुकसान होईल

भारतात सध्या वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. (mistakes) आरबीआयच्या 2024 च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात वैयक्तिक कर्ज क्षेत्रात 24% पेक्षा अधिक वाढ झाली आहे. लग्न, वैद्यकीय खर्च, घरबांधणी किंवा जुने कर्ज फेडण्यासाठी लोक सहज उपलब्ध होणाऱ्या कर्जाकडे वळत आहेत. मात्र, ही सोय आर्थिक फासात अडकवणारी ठरू शकते, जर काही चुका टाळल्या नाहीत तर. खाली अशाच 10 सामान्य चुका दिल्या आहेत, ज्या तुम्ही टाळल्यास कर्जाचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित होऊ शकतो.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा :
1. झटपट मंजुरीच्या आमिषाला बळी पडणे :

‘मिनिटांत मंजूर होणारे कर्ज’ ऐकून अनेक जण आकर्षित होतात, पण तेवढ्यावरच थांबू नका. कमीत कमी 3 ते 4 कर्जदात्यांची तुलना करा. व्याजदर, प्रक्रिया शुल्क, प्रीपेमेंट सुविधा आणि लपवलेले अटी जाणून घ्या.

2. फक्त व्याजदर पाहणे आणि एकूण खर्चाकडे दुर्लक्ष करणे :

कमी व्याजदराच्या जाहिराती मोहात टाकतात, पण त्यामागे प्रक्रिया शुल्क, विमा, इतर शुल्क असतात. त्यामुळे ‘एकूण परतफेडीचा खर्च’ लक्षात घ्या.

3. क्रेडिट स्कोअरकडे दुर्लक्ष करणे :

तुमचा क्रेडिट स्कोअरच तुमच्या कर्जाच्या अटी ठरवतो. स्कोअर 750 पेक्षा कमी असेल तर कर्ज नाकारलं जाऊ शकतं किंवा जास्त व्याज आकारलं जातं.

4. गरजेपेक्षा जास्त रक्कम घेणे :

सहज मिळणाऱ्या कर्जामुळे अनेक जण गरजेपेक्षा जास्त रक्कम घेतात. (mistakes)पण प्रत्येक अधिकच्या रकमेवर व्याज लागतो. गरजेपुरतेच कर्ज घ्या.

5. चुकीचा कार्यकाल निवडणे :

लहान कार्यकाल म्हणजे जास्त EMI, मोठा कार्यकाल म्हणजे जास्त व्याज. EMI तुमच्या उत्पन्नानुसार सहज भरता येईल असा कार्यकाल निवडा.

6. कर्ज अटी न वाचणे :

बारीक अक्षरात असलेल्या अटी प्रीपेमेंट, फोरक्लोजर शुल्क वाचल्या जात नाहीत. करार वाचल्याशिवाय साइन करू नका.

7. गुंतवणुकीसाठी कर्ज घेणे :

शेअर बाजार, क्रिप्टो किंवा अपारदर्शक योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेणे धोकादायक आहे. परतावा हमीचा नसतो, पण कर्ज परतफेड ठरलेली असते.

8. बनावट कर्ज अ‍ॅप्सकडे वळणे :

इंस्टंट लोन अ‍ॅप्सच्या जाळ्यात अडकून अनेकांची फसवणूक होते. RBI-नोंदणीकृत कर्जदात्यांकडूनच कर्ज घ्या.

9. परतफेडचं नियोजन न करणे :

EMI साठी ऑटो-डेबिट सेट करा. (mistakes)परतफेड वेळेवर झाली नाही तर क्रेडिट स्कोअर खराब होतो आणि दंड लागतो.

10. प्रीपेमेंटचा विचार न करणे :

बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्नातून कर्जाची प्रीपेमेंट करा. यामुळे व्याजात मोठी बचत होऊ शकते.

महत्वाची टीप :
वैयक्तिक कर्ज गरजेच्या वेळी उपयोगी ठरू शकतं. पण ते बोजा होऊ नये यासाठी माहितीपूर्ण आणि नियोजित निर्णय घ्या. या 10 चुका टाळा, आत्मविश्वासाने कर्ज घ्या आणि आर्थिक शिस्त राखा.

हेही वाचा :