सोन्याची चकाकी उतरली, भाव कमी झाले; वाचा तुमच्या शहरातील दर

सोन्याच्या भावात आज घसरण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे भाव वाढत आहेत. (several)दरम्यान, आज सोन्याची झळाली कमी झाली आहे. सोन्याचे भाव आज कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचे भाव आज प्रति तोळा ४४० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर आजच करा.

२४ तोळे सोन्याच्या किंमत प्रति तोळा ४४० रुपयांनी घसरण झाली आहे. आज १ तोळा सोन्याचे दर ९७,६४० रुपये आहे. काल हेच दर ९८,०८० रुपये होते. या किंमती घसरल्या आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,११२ रुपये आहेत. या दरात ३५२ रुपयांनी घट झाली आहे. १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ४४०० रुपयांनी घट झाली आहे.(several)आज २२ कॅरेट सोन्याचे दर ४०० रुपयांनी घसरले आहेत. १ तोळा सोन्याचे दर ८९,५०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,६०० रुपये आहेत. या किंमतीत ३२० रुपयांनी घट झाली आहे. १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात ३३० रुपयांनी घट झाली आहे. आज १ तोळा सोने ७३,२३० रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे.

अनेकजण आपल्या लेकीच्या लग्नासाठी दागिने करत असतात. थोडे-थोडे पैसे जमवून सर्वसामान्य नागरिक दागिने करतात. परंतु सध्या सोन्याचे दर खूप वाढले आहेत. (several)जीएसटी मिळून सोन्याचे भाव १ लाखांच्या पार गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. यामुळे सोन्याचे भाव बघूनच खरेदीसाठी जा.

हेही वाचा :

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना धक्का, दिग्गज नेता भाजपच्या वाट्यावर

‘त्याने माझ्याकडे पाहून पँटची चैन उघडली अन्…’; अभिनेत्रीसोबत मुंबईच्या रस्त्यावर घडला विचित्र प्रकार

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल! ‘या’ तारखेपासून सुरु होणार Admission