दोन महिने उलटूनही पिरियड्स (periods)आले नसल्याने अनेक महिलांमध्ये चिंता वाढत आहे. बदललेली जीवनशैली, ताणतणाव, हार्मोन्समधील असंतुलन किंवा आहारातील बदल ही यामागची प्रमुख कारणे मानली जातात. अशा परिस्थितीत काहीजणी त्वरित औषधांचा पर्याय निवडतात, मात्र तज्ज्ञांच्या मते सुरुवातीला काही सोपे घरगुती उपाय करूनही फरक जाणवू शकतो.

पिरियड्स नियमित येण्यासाठी (periods)शरीरातील उष्णता आणि हार्मोनल संतुलन महत्त्वाचे असते. त्यामुळे हळदीचे दूध, आल्याचा काढा किंवा गुळ-जीरं यांचे सेवन फायदेशीर ठरते. विशेषतः दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत गुळ आणि थोडं जिरं घेतल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि पिरियड्स सुरू होण्यास मदत मिळते.तसेच पपईचा आहारात समावेश केल्यानेही चांगला परिणाम दिसून येतो. पपई शरीरातील उष्णता वाढवते, ज्यामुळे पिरियड्स लवकर येण्यास मदत होते.
यासोबतच हलका व्यायाम, (periods)योगा आणि पुरेशी झोपही तितकीच आवश्यक आहे.ताणतणाव कमी ठेवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सततची चिंता आणि मानसिक तणाव हे पिरियड्स उशिरा येण्यामागचं एक मोठं कारण असू शकतं. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातो.मात्र, हे उपाय करूनही ५ ते ७ दिवसांत फरक दिसला नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. कारण काही वेळा ही समस्या गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे वेळेवर योग्य निदान आणि उपचार घेणं गरजेचं आहे.