‘मोदी तुमचा बाप असेल…’ नाना पटोलेंच्या विधानानंतर सभागृहात खळबळ

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज एक मोठा गदारोळ पहायला मिळाला.(statement)काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शब्दबाण चालवत, “मोदी तुमचा बाप असू शकतो, पण शेतकऱ्यांचा नाही!” असं वक्तव्य केल्याने सभागृहात खळबळ उडाली. त्यानंतर या भाषेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आक्षेप घेत नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केलं आहे.आजच्या चर्चेदरम्यान, नाना पटोले यांनी कृषीमंत्री लोणीकर यांच्यावर शेतकऱ्यांच्या अपमानाचा आरोप केला. ते म्हणाले, “या सरकारचे मंत्री शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. पंतप्रधान मोदी तुमचे असतील, पण शेतकऱ्यांचे नाही. ही भाषा सहन केली जाणार नाही.”या वक्तव्यानंतर पटोले थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले आणि आक्रमकपणे बोलू लागले, त्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.

विधानसभा अध्यक्षांनी लगेच या भाषेवर आक्षेप घेत, “असंसदीय भाषा वापरणं योग्य नाही.(statement) हे कदाचित तुमचं मत असेल, पण या सदनात असे वर्तन चालणार नाही,” असं स्पष्ट करत पटोलेंना दिवसभरासाठी निलंबित केलं. यानंतर नाना पटोले बाहेर येऊन माध्यमांसमोर आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडली.सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “मोदी तुमचा बाप असू शकतो, आमचा नाही. आम्ही शेतकऱ्यांची लढाई लढणार. आत्महत्या वाढत असताना हे सरकार केवळ भाषणं करतंय. बियाण्यांचे दर वाढले, पिकांचे भाव पडले – शेतकरी भरडला जातोय.”

त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधत म्हटलं की, “फडणवीस शेतकरीविरोधी आहेत.(statement) आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही.”दरम्यान, नाना पटोलेंच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपकडून यावर तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक संघर्ष आता अधिक वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :