महायुतीला मोठा धक्का बसणार; ‘हा’ बडा नेता सोडणार साथ, लवकरच काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?

महादेव जानकर यांच्याविषयी मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडून(political) निवडणूक लढवली होती. त्यामध्ये अल्पशा मताने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते पाच वर्ष कॅबिनेट मंत्री देखील होते. महायुतीकडून ते लोकसभाही लढले. मात्र, ते आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

आता त्यांनी 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे महादेव जानकरांचा ओढा काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षाकडे दिसत आहे. ते आता काँग्रेसमध्ये जाणार आहेत सं बोलल जातय.

लोकसभा निवडणुकीपासूनच(political)जानकर यांची पावले महाविकास आघाडीकडे वळताना दिसत आहेत. त्यांच्या या हालचालींमुळेच महायुतीतील नेतृत्वामध्ये अस्वस्थता जाणवत होती. लोकसभेवेळी ते माढा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी त्यांना महायुतीने परभणीतून उमेदवारी देत त्यांना रोखून धरलं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत मात्र, त्यांनी वेगळी चूल मांडली.

जानकर यांचे पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघात वर्चस्व आहे. बारामती व आसपासच्या मतदारसंघांमध्ये महायुतीच्या संभाव्य मते फोडू शकतात, विशेषतः राष्ट्रवादीच्या गटांमध्ये मतविभाजन रोखण्याच्या दृष्टीने काँग्रेसला बळकटी मिळू शकते. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाला स्थानिक स्तरावर नव्याने समिकरण तयार करावे लागतील. अन्यथा महादेव जानकर यांच्या काँग्रेसप्रवेशामुळे निवडणुकीचे चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :

आषाढी वारीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: ‘या’ वाहनांना टोलमाफी!

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 1 ऑगस्टपासून बॅलन्स चेकच्या नियमांमध्ये मोठा बदल

हृतिक रोशनची साऊथ सिनेमात एन्ट्री! निर्मात्यांनी केली घोषणा, लवकरच ‘या’ चित्रपटात दिसणार