‘पंचायत’ मालिकेमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता आसिफ खान याला सोमवारी अचानक हृदयविकाराचा झटका(heart attack) आला, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘बॉलीवूड बबल’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आसिफ खानची प्रकृती आता स्थिर आहे, त्याची प्रकृती सुधारत आहे आणि उपचारांचा त्याच्यावर चांगला परिणाम होत आहे.’
पंचायत फेम अभिनेता आसिफ खानला हृदयविकाराचा झटका(heart attack) आला आहे. सोशल मीडियावर आसिफ खानने पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. बरे झाल्यानंतर लगेचच, आसिफ खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक संदेश देखील शेअर केला ज्यामध्ये त्याने आयुष्याला हलके न घेता प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याबद्दल सांगितले.
त्याने लिहिले, ‘गेल्या ३६ तासांपासून हे पाहिल्यानंतर मला कळले आहे. आयुष्य लहान आहे, एकाही दिवसाला हलके घेऊ नका, एका क्षणात सगळं बदलू शकते, तुमच्याकडे असलेल्या आणि तुम्ही कोण आहात याबद्दल कृतज्ञ रहा. तुमच्यासाठी कोण जास्त महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा आणि नेहमी त्यांची कदर करा. आयुष्य ही एक देणगी आहे आणि आपण धन्य आहोत.’
वेब सिरीज
‘मिर्झापूर’, ‘पाताल लोक’ आणि अनेक प्रसिद्ध वेब सिरीजमधील त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या आसिफने त्याच्या बहुमुखी अभिनय कौशल्याने मोठा चाहता वर्ग मिळवला आहे. आसिफ खान अलीकडेच ‘द भूतनी’ आणि ‘काकुडा’ या चित्रपटांमध्ये दिसला होता.
डॉक्टरांनी दिला सल्ला
आसिफ आणखी काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहण्याची अपेक्षा असली तरी, त्याच्या आरोग्याबद्दल काळजी करणाऱ्यांसाठी ही सकारात्मक बातमी दिलासा देणारी आहे.
हेही वाचा :