माता न तू वैरिणी ! ट्रॅव्हल्समधून महिलेने अर्भकाला फेकले रस्त्यावर

पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून नवजात बाळ(baby ) महार्गावर फेकले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका जोडप्याविरोधता गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पुणे येथून परभणीकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवास करत असलेल्या 19 वर्षीय विवाहितेची झाली. प्रसुती नंतर ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून पुरुष जातीचे अर्भक(baby ) महामार्गावर फेकले. ही घटना तालुक्यातील देवनांद्रा शिवारात घडली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले.

पाथरी सेलू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 वर शहरापासून दोन किमी अंतरावर देवनांद्रा शिवारात हा प्रकार उघडकीस आला. शेतात काम करणाऱ्या एका व्यक्तीने सदर प्रकार पाहिल्या बरोबर 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. बसमधून प्रवास करणारी 19 वर्षीय तरुणी आणि 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघडकीस आली. दोघांनी अंतरजातीय प्रेम संबंधातून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे पुणे येथे कामाला होते. यातूनच ही तरुणी गर्भवती राहिली होती. सोमवारी तरुणीच्या पोटात वेदना होत असल्याने पुण्याहून परभणीला खाजगी ट्रॅव्हल्सने येत होते.

ट्रॅव्हल्समध्ये या तरुणीने बाळाला जन्म दिला. बाळ मृत जन्मले,त्यानंतर हे अर्भक चालत्या गाडीतून महामार्गावर फेकून दिले होते. संबंधित दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 94 आणि 3(5) नुसार पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :