देशातील एक प्रमुख बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँक या आठवड्यात डिजिटल बँकिंग सेवा देखभालीसाठी काही काळासाठी तात्पुरती बंद राहणार आहेत.(services ) जर तुमचं खाते या बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.हव्या वेळेस ऑनलाइन व्यवहार करायचे असल्यास, नियोजनपूर्वक व्यवहार पार पाडा, कारण काही सेवा काही तासांसाठी अनुपलब्ध राहणार आहेत. बँकांनी अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली आहे.
कोटक बँकेचे देखभाल कार्यही काही वेळेसाठी ग्राहकांच्या सेवांवर परिणाम करणार आहे. (services )१७ आणि १८ जुलै रोजी रात्री १२ ते पहाटे २ वाजेपर्यंत कोटकच्या मोबाईल बँकिंग व नेट बँकिंगद्वारे NEFT व्यवहार करता येणार नाहीत.यानंतर, २० आणि २१ जुलै दरम्यान, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI आणि पेमेंट गेटवे सेवा देखील ठराविक वेळेसाठी बंद असणार आहेत.
त्यानुसार, २०-२१ जुलै रोजी रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत कोटकच्या पेमेंट गेटवे सेवा सुद्धा थांबणार आहेत. (services )त्यामुळे ज्या ग्राहकांना महत्त्वाचे व्यवहार करायचे असतील त्यांनी हे व्यवहार या वेळेपूर्वी पूर्ण करावेत, असा सल्ला बँकेने दिला आहे.
हेही वाचा :