गुंतवणूकदार खूश! हिंदुस्तान झिंकच्या शेअर्समध्ये तुफान तेजी
हिंदुस्तान झिंकच्या शेअर्समध्ये(investors) सध्या दमदार वाढ दिसून येत आहे. 10 मे रोजी ट्रेडिंग दरम्यान हिंदुस्तान झिंकचे शेअर्स 12% पेक्षा जास्त वाढले आणि 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. चीनकडून मिळालेल्या सकारात्मक व्यापार डेटामुळे लंडन मेटल एक्सचेंजवर झिंकची किंमत 2 टक्क्यांहून अधिक वाढून 2,955 डॉलरवर पोहोचली.
ज्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर(investors) दिसत आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर शु्क्रवारी दुपारी 2:41 वाजता, हिंदुस्थान झिंकचा शेअर 12.68 टक्क्यांच्या वाढीसह 514.00 रुपयांवर व्यवहार करत होता.
चीन हा झिंकचा प्रमुख उत्पादक आणि ग्राहक दोन्ही आहे. शिवाय, झिंकच्या किमतीत झालेली वाढ हिंदुस्थान झिंकसाठी चांगली आहे, कारण ती झिंक मायनिंग आणि रिफायनिंग व्यवसायात गुंतलेली आहे.
याशिवाय कंपनीने प्रति शेअर 10 रुपये अंतरिम लाभांशही मंजूर केला आहे. यासाठी कंपनीला 4,225.32 कोटी खर्च करावे लागतील. हिंदुस्तान झिंकचा मार्च तिमाहीत महसूल 7,549 कोटी होता आणि त्याचे मार्जिन देखील अंदाजापेक्षा चांगले होते. डिसेंबर तिमाहीत कंपनीचे कर्ज (निव्वळ कर्ज) 370 कोटी होते, तर मार्च तिमाहीत कंपनीकडे 1,700 कोटींची रोख होती.
आर्थिक वर्ष 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये तिचे माइन आणि रिफाइंड मेटलचे उत्पादन वाढू शकते असे कंपनीच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त, कंपनीचा भांडवली खर्च अंदाजे 270 कोटी ते 325 कोटीमध्ये असण्याचा अंदाज आहे.
नोंद – म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
हेही वाचा :
दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, रिषभ पंतवर बंदी3
इंग्रजांना घालवले तर मोदी काय चीज? शरद पवार यांचा सवाल
शांतिगिरी महाराज आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा