वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला

कसबा बावड्यातील राजाराम बंधारा येथे पोहण्यास आलेल्या बारा वर्षीय मुलाचा (father)आज दुपारी बुडून मृत्यू झाला. उज्ज्वल गंगाराम बडिगेर रा. कसबा बावडा, मूळ गोकाक असे त्याचे नाव आहे. उन्हाळी सुटीमुळे तो वडील आणि भावासोबत पोहण्यासाठी आला होता. वडील काठावर आले असताना उज्ज्वल बंधाऱ्यातील बरग्यांवरून दुसऱ्या बाजूला कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध झाला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.

याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी मूळचे गोकाकचे (father) असलेले गंगाराम बडिगेर फरशी बसविण्याची कामे करतात. ते कसबा बावडा येथे पत्नी, दोन मुलांसोबत भाडेतत्त्वावर राहतात. ते दोन मुलांना घेऊन दुपारी पोहण्यासाठी राजाराम बंधाऱ्यावर आले होते. मुले पोहत असताना ते लघुशंकेसाठी काठावर आले. इतक्यात उज्ज्वल खोल पाण्यात गेल्याने बंधाऱ्याला लावलेल्या बरग्यांवरून दुसऱ्या बाजूला कोसळला. हा प्रकार समजताच त्याच्या मोठ्या भावाने आरडाओरडा करून वडिलांना बोलावून घेतले.

कसबा बावडा येथील राहुल भोजणे, आपत्ती व्यवस्थापनचे निवास जाधव, (father)bb आशीष माळी, सुशांत पोवार यांनी प्रयत्न करून उज्ज्वलला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले. त्याला तातडीने सीपीआरमध्ये आणले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच उज्ज्वलची आई, नातेवाईक सीपीआरमध्ये दाखल झाले. मुलाच्या मृत्यूची माहिती कळताच कुटुंबीयांचा आक्रोश पिळवटून टाकणारा होता.

हेही वाचा

आता 100 रुपयांच्या मालावरही द्यावा लागणार टॅक्स

जास्त पगार असूनही बँक कर्ज देत नाहीये? तर ‘या’ ४ गोष्टींकडे लक्ष द्या

MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू