शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे.(tables) गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली होती. दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठकाही झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे 22 ते 23 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 22 ते 23 आमदार (tables) शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. जे आमदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक नाहीत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच इच्छूक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आमदारांनी शरद पवार यांची भेटही घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीत पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली, यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना 22 आमदारांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, ‘आमच्याकडे असा प्रस्ताव आलेला नाही, मात्र प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू. शरद पवार यांच्या नेतृत्वात त्यांना काम करायचे असेल तर आम्ही नक्की विचार करू.’

आज झालेल्या पक्षाच्या बैठकीबाबत बोलताना शिंदे म्हणाले(tables) की, पक्ष संघटना मजबूत करुन मोठ्या उमेदीनं पुढे जायचं आहे पक्षात पूर्ण ताकतीनं पक्ष उभा करण्याची चर्चा झाली. आता दोन्ही पक्षांच्या विलिनिकरणाचा विषय संपलेला आहे. आमचा पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जाणार आहे, आम्ही वेगवेगळे मुद्दे हाताळू. मविआ म्हणून 15 आँगस्ट नंतर राज्यात दौरे करणार आहोत. संयुक्तपणे दौरे करणार आहोत. जनभावना उभी करायची आहे. मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत.

हेही वाचा

आता 100 रुपयांच्या मालावरही द्यावा लागणार टॅक्स

जास्त पगार असूनही बँक कर्ज देत नाहीये? तर ‘या’ ४ गोष्टींकडे लक्ष द्या

MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू