देशभरात हवामानाचा दुहेरी परिणाम दिसून येत आहे.(warning) एका बाजूला उत्तर, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू असून तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, तर दुसरीकडे २३ राज्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि थर वाळवंटातून येणारे उष्ण आणि कोरडे वारे उत्तर भारतात तीव्र उष्णता निर्माण करत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, ओडिशा आणि महाराष्ट्र येथील १६ शहरांमध्ये तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे ४८ अंश सेल्सिअस, मध्य प्रदेशातील खजुराहो येथे ४७.४ अंश सेल्सिअस, तर वर्धा येथे ४७.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

दिल्लीत कमाल तापमान ४४.५ अंश सेल्सिअस आणि किमान २८.३ अंश सेल्सिअस (warning) नोंदले गेले असून पुढील पाच दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. २४ ते २६ मे दरम्यान पंजाब, हरियाणा आणि चंदीगड येथे उष्णतेची तीव्र लाट कायम राहील. विदर्भ, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, बिहार, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्येही उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.हवामान विभागाच्या मते, नैऋत्य मोसमी वारे कोमोरिन समुद्र, श्रीलंका आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहेत. पुढील काही दिवसांत ते लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण भारतात मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला आहे.
ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, (warning) मिझोराम आणि त्रिपुरा येथे २२ ते २६ मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.पूर्व भारतातील अंदमान-निकोबार, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा येथेही हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानातील या बदलांमुळे नागरिकांनी पुढील काही दिवस विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा
शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?
पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?
वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला