हैदराबाद: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करू शकतो अशी भीती आहे. त्याच वेळी, पहलगाम हल्ल्याबाबत देशभरात पाकिस्तानविरुद्ध निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच हैदराबादमधील भाजप नेत्यांच्या(BJP leader) निषेधाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसावं की रडावं हे कळणार नाही.

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात देशभर निदर्शने सुरू आहेत. सामान्य जनता केंद्रातील भाजप सरकारकडून सूड घेण्याची मागणी करत आहे, पण याच दरम्यान एका भाजप नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप नेत्याच्या या वर्तणुकीमुळे पक्षाची बदनामी झाल्याचे बोलले जात आहे. सचिन गुप्ता नावाच्या एक्स युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधात हैदराबादमध्ये भाजप नेते आणि त्यांचे काही समर्थकांकडून आंदोलन सुरू होते. या आंदोनलनाचा व्हिडीओही रेकॉर्ड केला जात होता. निषेधादरम्यान एका भाजप नेत्याने(BJP leader) हिंदुस्थानऐवजी “जय हो पाकिस्तान जय हो” च्या घोषणा दिल्या. पण आपली चूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच ‘हिंदुस्तान जय हो’ च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. पाकिस्तान जय होच्या नारेबाजीमुळे भाजप नेत्याला स्वत: चीच लाज वाटली आणि त्यांनी त्यांची जीभही दाबली. मात्र, आता या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, युजर्सकडून सोशल मीडियावर भाजप नेत्याला जोरदार ट्रोल केलं जात आहे. यावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने असा दावा केला आहे की, ‘ नेताजींच्या मनात जे होते ते त्यांच्या मुखातून बाहेर पडले आहे. म्हणजे नेताजींच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, जे चुकून त्यांच्या तोंडून बाहेर पडलं.
दुसऱ्या एका युजरने असा प्रश्न केला आहे की, जर भाजप नेत्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने ही चूक केली असती तर तो तुरुंगात असता. दुसऱ्या एका वापरकर्त्याने, हे जीभ घसरल्यामुळे हे घडले नाही, तर त्यांनी हे जाणूनबुजून केले आहे, असं म्हटलं आहे. तसेच, त्याने हैदराबाद पोलिसांकडे या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा :
आज सोन्याच्या दरात पुन्हा बदल; महाग झालं की स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे भाव
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता 53 टक्के होण्याची शक्यता
चिमुकल्यासमोरच बायकोला संपवलं; बॉडी घेऊन बाईकवरुनचं निघाला अन्…