पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडीवर

सांगली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा(politics) निवडणुकीचाफैसला आज होत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपचे संजय पाटील यांनी पोस्टल मतमोजणीत आघाडी घेतल्यानंतर पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. सहाही मतदारसंघात विशाल पाटील आघाडीवर आहेत.

सांगलीकर जनतेत निकालाविषयी() उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप उमेदवार संजय पाटील हॅट्ट्रिक करणार? उद्धव सेना चमत्कार घडविणार? की अपक्ष विशाल पाटील इतिहास रचणार याचं उत्तर दुपारपर्यंत मिळणार आहे.

सांगली जिल्ह्याची यंदाची लोकसभा निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेची ठरली. उमेदवारीवरून महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष स्थानिक, तसेच राज्यपातळीवर झाला. अखेर महाविकास आघाडीत उद्धवसेनेला ही जागा गेली. त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरविले.

दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. भाजपविरुद्ध अपक्ष अशी चुरस यावेळी दिसून येत आहे. यात बाजी कोण मारणार हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. अपक्ष उमेदवाराला कधीही या मतदारसंघात यश मिळाले नसल्याने विशाल पाटील यंदा हा इतिहास नोंदविणार की संजय पाटील यांच्याकडून हॅट्ट्रिक नोंदली जाणार याचीही चर्चा रंगली आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरमध्ये कारने चौघांना चेंडूसारखं हवेत उडवलं! 3 ठार Video

6 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची

लोकसभेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत कोल्हापुरात ‘सतेज’ करिश्मा