मोठी ट्विस्ट… भाजपला जबरदस्त धक्का… जोरदार बढतीनंतर मोठी घसरण

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होऊ आता जवळपास दीड तास(political news today) उलटला आहे. पहिल्या फेरीतील कल हाती आले आहेत. मतमोजणी सुरू होताच भाजपने जोरदार आघाडी घेतली होती. जवळपास 300 च्यावर जागांवर भाजपने आघाडी घेतल्याचं चित्र होतं. त्यामुळे भाजप निर्विवादपणे सत्तेत येईल असं वाटत असतानाच मोठा ट्विस्ट आला आहे. अचानक भाजपची घसरण सुरू झाली आहे.

सध्याच्या कलानुसार भाजप 280 जागांवर आघाडीवर(political news today) आहेत. तर इंडिया आघाडी 228 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीला भाजपने 311 जागांवर आघाडी घेतली होती. तर काँग्रेसने 141 जागांवर आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजप निर्विवाद बहुमताच्या पुढे गेली होती. मात्र, अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा चक्र फिरलं आहे. भाजप 276 जागांवर आघाडीवर असल्याचे आकडे आले आहेत. तर इंडिया आघाडी 229 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे. ज्या पद्धतीने कल येत आहेत, त्यानुसार मोदींची लाट ओसरल्याचं दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणासीमध्ये पिछाडीवर आहेत. या ठिकाणी काँग्रेसच्या अजय राय यांनी आघाडी घेतली आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. मोदींच्या नेतृत्वात भाजप निवडणूक लढली आहे. मोदींच्या लाटेमुळे भाजपला दोनदा पूर्ण बहुमताची सत्ता मिळाली आहे. उत्तर प्रदेशात राम मंदिराची उभारणीही करण्यात आली. मात्र, त्यानंतरही मोदी वाराणासीत पिछाडीवर गेल्याने भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशाने भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. उत्तर प्रदेशात भाजप अवघ्या 32 जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पार्टी 37 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस सहा जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा सर्वांचा अंदाज होता. मात्र हा अंदाज फोल ठरला आहे. भाजपसाठी उत्तर प्रदेशातील कल अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रातही भाजप धोबीपछाड होताना दिसत आहे. कलानुसार महाराष्ट्रात महायुतीला अवघ्या 19 जागा मिळताना दिसत आहेत. तर महाविकास आघाडीला 27 जागांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा सेट बॅक असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा :

आता T20 वर्ल्ड कप बघा ‘फ्री’ ते ही मोबाईल आणि टीव्हीवर

भारत- पाक सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आलं मोठं कारण

वरुण धवन झाला बाबा, पत्नी नताशाने दिला गोंडस मुलीला जन्म