मनोरंजन सृष्टीतून मोठी बातमी समोर! अभिनेत्री अमृता खानविलकरचं अपहरण?
मुंबई : मनोरंजनसृष्टीतून मोठी बातमी(Big news) समोर येत आहे.झी मराठीवर ३ जूनला संध्याकाळी एक ब्रेकिंग न्यूज प्रसारित झाली, ती म्हणजे दोन नामवंत कलाकारांच्या अपहरणाबद्दल. संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकरचं झालंय अपहरण. संकर्षण एका जाहिरातीसाठी शूट करत असताना त्याला त्याचवेळी एका वाहनात टाकून नेण्यात आलं.
तर दुसरीकडे अमृताला(Big news) आपल्या व्हॅनिटी मधून बाहेर पडताच तिचे चाहते आणि बॉडीगार्डच्या उपस्थितीत किडनॅप केले गेले. ह्या दोन नामवंत कलाकारांना कुठे आणल गेलंय, खरंच हे दोघांचं अपहरण झालंय की हा कोणता नवीन ड्रामा आहे. हे जाणून घेण्यासाठी बघत राहा झी मराठी.
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. संकर्षण आणि अमृताचं अपहरण झालं आहे. नुकताचं याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
झी मराठीच्या सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओत अमृता आणि संकर्षणचं अपहरण झाल्याचं दिसत आहे. मात्र अमृता आणि संकर्षणचं खरोखर अपहरण झालं नसून एका नव्या मालिकेचा हा प्रोमो आहे.
लवकरच झी मराठीवर एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर दिसणार आहेत.. या नव्या मालिकेच्या प्रोमोमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. “दोन नामवंत मराठी कलाकारांचं अपहरण..! कोणी घडवून आणलंय हे सांर.. समजणार लवकरच…”, असं म्हणत झी मराठीच्या ऑफिशियल पेजवरुन हा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या मालिकेचं नाव अद्याप गुलदस्त्यात असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेसाठी प्रेक्षकही उत्सुक असल्याचं दिसत आहे. झी मराठी वाहिनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते.
हेही वाचा :
महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली…
टी20 वर्ल्ड कपमध्ये पैशांची बरसात, इतिहासात पहिल्यांदाच ICCने प्राईज मनीत केली ‘इतकी’ वाढ
सेन्सेक्स तब्बल ५००० अंकांनी कोसळला; गुंतवणुकदारांचे २० मिनिटातच २० हजार कोटी बुडाले