काठावर पास, पण नावापुढे खासदार ला कमी मतांनी जिंकलेले उमेदवार

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. या निवडणुकीसाठी देशभरातील राजकीय पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराच्या तोडा धडाडत आहेत. (candidate search)यंदाची लोकसभा निवडणूक 7 टप्प्यांमध्ये होत आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 4 जून रोजी निकाल लागणार आहे.

गेल्या निवडणुकीमध्ये एनडीएने बहुमत मिळवत सरकार (candidate search)स्थापन केले होते. मात्र मधल्या बरेच पाणी वाहून गेले असून आता एनडीए विरोधात विरोधकांनी मोट बांधत ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. मात्र गेल्या निवडणुकीमध्ये देशात 5 अशा जागा होत्या जिथे उमेदवार ‘काठावर पास’ झाला होता अर्थात कमी मतांनी निवडून आला होता. हे मतदारसंघ कोणते, विजयी आणि पराभूत उमेदवार कोण आणि किती मतांनी विजय मिळवला हे पाहूया…

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सर्वात कमी मतांनी विजयी झालेला उमेदवार उत्तर प्रदेशमधील मछलीशहर येथील आहे. येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भोलानाथ उर्फ बीपी सरोज यांनी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार त्रिभुवण राम यांच्यावर अवघ्या 181 मतांनी (candidate search)विजय मिळवला होता.

2. Lakshadweep

लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोहम्मद फैजल पी.पी. यांनी काँग्रेस उमेदवार हमदुल्लाह सय्यद यांचा अवघ्या 823 मतांच्या फरकाने पराभव केला होता.

3. Arambagh, West Bengal

पश्चिम बंगालमधील आरामबाग येथे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार अपरुपा पोद्दार यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तपन कुमार रॉय यांच्यावर 1142 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

4. Andaman & Nicobar Islands

अंदमान आणि निकोबार बेटावरील एकमेव जागेवर काँग्रेसने विजय मिळवला होता. काँग्रेस उमेदवार कुलदीप राय शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाच्या विशाल जोली यांचा 1407 मतांनी पराभव केला होता.

5. Khunti, Jharkhand

झारखंडमधील खुंटी मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये कांटे की टक्कर पहायला मिळाली होती. मात्र भाजप उमेदवार अर्जुन मुंडा यांनी काँग्रेसच्या कालीचरण मुंडा यांचा 1445 मतांनी पराभव करत खासदारकीची निवडणूक जिंकली होती.

हेही वाचा :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले अन् डिगे कोल्हापूरचे खासदार झाले

खळबळजनक ! मित्रावरच केला अनैसर्गिक अत्याचार,

‘असं वाटतं कॉलेजमधील सगळ्या मुली माझ्या प्रेमात..’, तरुणाला झाला विचित्र आजार;