निवडणुकीपुर्वी सुप्रिया सुळेंना धक्का!

निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला आहे. सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने यांनी आज अजित पवार गटामध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये राजकीय धुमश्चक्री सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री (anaphylactic shock)अजित पवार यांचे हात बळकटीकरणासाठी, इंदापूरच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रह यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी केली

इंदापूर येथील माने परिवाराच्या सोनाई निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषद मध्ये प्रवीण माने बोलत होते. यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले, आज पासूनच महायुतीचा प्रचाराला सुरवात करणार आहे. सुनेत्रा वहिनीची अनेक कामे केली. फोरमच्या माध्यमातून लाखो गोर गरीबांची नेत्र तपासणी, बारामती टेक्सटाइल (anaphylactic shock)पार्कच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचे काम केले. यामुळे अजित पवार यांचे बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीत असल्याचे सांगितले.

तर पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी माने यांचे स्वागत करीत लोकांनां राजकारणापेक्षा विकास महत्वाचा वाटतो.सहभुती पेक्षा विकासाला प्राधान्य दिले जाते. यामुळे माने परिवाराचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक (anaphylactic shock)राष्ट्रहिताचा प्राधान्य देणारी निवडणूक आहे.नरेंद्र मोदी की राहून गांधी अशी विचारणारी ही निवडणुक असून जनता राष्ट्रहिताचा प्राधान्य देत आहे.

दरम्यान प्रवीण माने यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीला बळ मिळाले असल्याचे बोलले जाते आहे

हेही वाचा :

आठवड्यात सुट्यांचा मुक्काम; केवळ 3 दिवस बँका सुरु राहणार

काठावर पास, पण नावापुढे खासदार ला कमी मतांनी जिंकलेले उमेदवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले अन् डिगे कोल्हापूरचे खासदार झाले